AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूरज चव्हाणनंतर हा ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; पार पडला साखरपुडा

बिग बॉस मराठी फेम अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार असून नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला. या अभिनेत्याने मार्च महिन्यात गर्लफ्रेंडला प्रपोज केलं होतं. आता साखरपुड्यानंतर लगेचच तो बोहल्यावर चढणार आहे.

सूरज चव्हाणनंतर हा 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; पार पडला साखरपुडा
जय दुधाणे आणि हर्षलाImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 24, 2025 | 1:39 PM
Share

डिसेंबरचा महिना आला की अनेकांकडे सनई-चौघडे वाजण्यास सुरुवात होते. लग्नसराईच्या या काळात अनेकजण बोहल्यावर चढतात. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला होता. त्यानंतर आता आणखी एका बिग बॉस फेम अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून जय दुधाणे आहे. ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये त्याने भाग घेतला होता आणि त्यात तो उपविजेता ठरला होता. जयने गर्लफ्रेंड हर्षला पाटीलशी साखरपुडा केला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या साखरपुड्यानंतर जय आणि हर्षला लगेचच लग्न करणार आहेत. नुकताच त्यांच्या हळदीचाही कार्यक्रम पार पडला आहे. या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जयची होणारी पत्नी ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून फॅशन आणि ट्रॅव्हलसंदर्भातील व्हिडीओ ती पोस्ट करते. जय आणि हर्षला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांचा साखरपुडा पार पडला. यावर्षी मार्च महिन्यात जयने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. हर्षलाला प्रपोज करतानाचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. उत्तराखंडच्या ट्रिपदरम्यान जयने तिला अत्यंत रोमँटिक पद्धतीने प्रपोज केलं होतं.

‘बिग बॉस मराठी’शिवाय जयला एमटीव्ही स्प्लिट्सव्हिलामुळेही प्रचंड लोकप्रियता मिळाली. जयनं या शोचं विजेतेपद पटकावलं होतं. तेव्हापासूनच तो तरुणाईमध्ये चर्चेत आहे. जयनं काही मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘वेड लागलं प्रेमाचं’ आणि ‘गडद अंधार’ यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला. तो लवकरच महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही दिवसांत बऱ्याच मराठी कलाकारांचा लग्नसोहळा, साखरपुडा पार पडला. प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुटवड, कोमल कुंभार, पूजा बिरारी-सोहम बांदेकर यांनी लग्न करत आयुष्याती नवी सुरुवात केली. तर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा नुकताच साखरपुडा पार पडला.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'