AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी खुशबखर, घेतला सर्वात मोठा निर्णय, अजितदादांच्या त्या 3 मागण्यांवरही सही, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीत अजितदादांनी केलेल्या तीन मागण्यांसदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशबखर, घेतला सर्वात मोठा निर्णय, अजितदादांच्या त्या 3 मागण्यांवरही सही, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका!
maharashtra cabinet meeting decision todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 10, 2026 | 3:13 PM
Share

Cabinet Meeting Decision Today : उपमख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज (10 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सहभाग घेतला. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदर येथील विमानतळाच्या निर्मितीसाठी भूमी अधिग्रहणाला मान्यता देण्यात आली आहे. इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्यम मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुरंदर येथील विमानतळाच्या उभारणीसाठी भूमी अधिग्रहण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भूमी अधिग्रहणास जो निधी लागणार आहे. त्या निधी उभारणीसही मान्यता देण्यात आलेली आहे. या विमानताळासाठी ज्या लोकांची जमीन जात आहे, त्या साधारण 96 टक्के लोकांनी जमीन देण्यास मान्यता दिलेली आहे.

एमएमआरडीएला अटल सेतूच्या जवळ प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जी जागा दिलेल आहे, आज त्या ठिकाणी सिडको आणि एमआयडीसीचे नियम लागू खरून जमीन अधिग्रहण करता येईल यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे तिसरी मुंबई संकल्पनेला चालना मिळेल.

जलसंपदा विभागातही अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 40 प्रकल्प आणि 100 कॅनल्स पूर्ण करण्यासाठी 15 हजार कोटी रुपये दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. हे सर्व प्रकल्प पुढच्या एक ते दोन वर्षात पूर्ण होतील.

बारामतीमध्ये 75 कोटींचे क्रीडा संकुल

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात पहिलीच मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत अजित दादांनी सांगितलेल्या 3 महत्त्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्र्यांनी केलं शिक्कामोर्तब आहे. या बैठकीत बारामती इथं ७५ कोटी रुपयांचे क्रीडा संकुल उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. वालचंदनगर – रत्नापूर MIDC साठी १००० एकर जागा उपलब्ध करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

अजितदादांचे तैलचित्र लावले जाणार

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ परिसरामध्ये दिवंगत अजितदादा पवार यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी त्यांचे तैलचित्र विधिमंडळ परिसरात लावण्यात येणार आहे.

Follow Us
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात.
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल.
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी.
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे.
धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणी..
धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणी...
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत...
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत....
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा.