Vidhan Parishad Election | महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
राज्यात विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावेळी महायुतीमध्ये जागावाटपावरून काहीसे नाराजीनाट्य सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची महत्त्वाची बैठक बोलावल्याचे समोर आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार असून महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. प्रत्येक घटक पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी पडद्यामागे मोठ्या बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे. दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून काही जागांवर अद्याप तिढा कायम असल्याची माहिती मिळत आहे. आता महायुतीतील हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महायुतीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या अपडेटनंतर सगळीकडेच आता महायुतीचा तिढा सुटणार, अशी चर्चा रंगली आहे.
Published on: May 26, 2026 01:39 PM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...