कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात
कांद्याला मिळत असलेल्या कमी दराविरोधात महाविकास आघाडीने राज्यभर आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव आणि विकलेल्या कांद्यावर 15 रुपये अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला होता.

या आंदोलनात राष्ट्रवादी (SP) चे आमदार रोहित पवार, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी रोहित पवार, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: May 26, 2026 01:02 PM
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...