धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणीसाठी केलं भयंकर कांड
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर बीडमधील कराड गँगची दहशत लोकांसमोर आली. कराडला अटक केल्यानंतरही बीडमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. अलीकडेच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर बीडमधील कराड गँगची दहशत लोकांसमोर आली. कराडला अटक केल्यानंतरही बीडमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. अलीकडेच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. तीन लाखांच्या खंडणीसाठी एका व्यक्तीला थेट जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही आरोपींविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी तीन लाख उकळण्यासाठी थेट गाडी अंगावर घालून एकाला मारण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार, हे वाल्मिक कराड गॅँगशी संबंधित असू शकतात. या प्रकरणातील आरोपी महादेव खाडे आणि रतन खाडे यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा एक फोटो देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे वाल्मिक कराडच्या मागे उभे दिसत आहेत. त्यामुळे ते याच गॅंगचे असल्याचा संशय बळावला आहे.
Published on: May 26, 2026 11:45 AM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...

