Rohit Pawar On Onion | 24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
कांद्याला मिळणाऱ्या घसरत्या दरांमुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली मोठा ‘क्रांती महामोर्चा’ काढण्यात आला. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखल्याने परिसरात वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषद आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.
कांद्याला मिळणाऱ्या घसरत्या दरांमुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली मोठा ‘क्रांती महामोर्चा’ काढण्यात आला. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखल्याने परिसरात वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषद आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
मोर्चादरम्यान बोलताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “या मोर्चाचं नेतृत्व सामान्य शेतकरी करत आहेत. आम्ही फक्त त्यांच्या पाठीशी उभे आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याला 24 रुपये भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता 12 रुपये भाव दिला जातोय. आंदोलनानंतर सरकारवर दबाव आल्यानं दरात थोडी वाढ झाली, पण त्यातून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही,” असा आरोप त्यांनी केला. रोहित पवार यांनी नाफेडच्या खरेदी प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. “नाफेडकडून फक्त 2 लाख टन कांदा खरेदी होणार आहे. शेतातून बाजारापर्यंत कांदा पोहोचवण्यासाठीच मोठा खर्च येतो. कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावं, तसेच परराज्यातही कांदा विक्रीसाठी परवानगी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, “पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून पुढील काही वर्षे शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. सरकारमध्ये सध्या फक्त विधान परिषद जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही,” अशी टीकाही त्यांनी केली. डिझेलसाठी रांगा लावाव्या लागत असताना शेतकऱ्यांवर काळाबाजाराचे आरोप करणं चुकीचं असल्याचं सांगत, “शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे,” असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
Published on: May 26, 2026 12:40 PM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...

