कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे, कांदा आंदोलनावरून सरकारला मोठा इशारा
कांद्याला मिळणाऱ्या घसरत्या दरांमुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली मोठा ‘क्रांती महामोर्चा’ काढण्यात आला. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखल्याने चांदवड परिसरात वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.
कांद्याला मिळणाऱ्या घसरत्या दरांमुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली मोठा ‘क्रांती महामोर्चा’ काढण्यात आला. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखल्याने चांदवड परिसरात वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.
या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झालेत. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेक नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलनात सहभाग घेतला आहे.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “या मोर्चाचं नेतृत्व सामान्य शेतकरी करत आहेत, आम्ही फक्त त्यांच्या पाठीशी उभे आहोत. सरकारने कांद्याला 24 रुपये भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता 12 रुपयांचा दर दिला जातोय. मोर्चानंतर सरकारवर दबाव आल्याने दरात थोडी वाढ झाली, पण त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही,” असा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांनी नाफेडवरही निशाणा साधत, “नाफेडकडून फक्त 2 लाख टन कांदा खरेदी होणार आहे. शेतातून बाजारापर्यंत कांदा आणण्यासाठीच लाखो रुपयांचा खर्च होतो. पुढील काही वर्षे शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे,” असं म्हटलं. तसेच, “आज सरकारमध्ये फक्त MLC जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.
Published on: May 26, 2026 11:51 AM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...

