AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांवर चित्रपट; अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?

भोंदूबाबा खरातचे सत्य आणि या प्रकरणातील राजकीय पडद्यामागच्या घडामोडी या चित्रपटातून उलगडणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे दीपाली सय्यद यांची भूमिका आणि चित्रपटाचे कथानक याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांवर चित्रपट; अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?
Deepali SayadImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 26, 2026 | 2:43 PM
Share

नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या धक्कादायक कारनाम्यांवर आधारित एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या बहुचर्चित चित्रपटात त्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारताना दिसू शकतात, अशी जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.

‘बिग बॉस’नंतर मिळाली खरातची माहिती अन् नागरिकांना दिला इशारा

या चित्रपटाबाबत बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरच मला भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या प्रकरणाची माहिती मिळाली. या चित्रपटात आपण एका महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नागरिकांना सतर्क करताना त्या म्हणाल्या की, “अशा भोंदूबाबांपासून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. समाजात असे अनेक खरात आजही कुठे ना कुठे लपून बसले असतील.” मात्र, चित्रपटातील आपल्या अचूक भूमिकेबाबत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. “माझी भूमिका नेमकी काय असेल, हे मी आताच सांगणार नाही, ते तुम्हाला लवकरच चित्रपटात पाहायला मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

रुपाली चाकणकरांवरील आरोपांवर सूचक भाष्य

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही काही आरोप झाले होते. यासंदर्भात विचारले असता, दीपाली सय्यद यांनी राजकीय क्षेत्रातील वास्तवावर बोट ठेवले. “राजकारणामध्ये जे कोणी काम करतात, त्यांच्यावर आरोप हे होतच असतात. मात्र, या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा खरोखरच हात होता की नाही, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल,” असे अत्यंत सूचक वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केले आहे.

भोंदूबाबा खरातचे सत्य आणि या प्रकरणातील राजकीय पडद्यामागच्या घडामोडी या चित्रपटातून उलगडणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे दीपाली सय्यद यांची भूमिका आणि चित्रपटाचे कथानक याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Follow Us
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
एकनाथ शिंदे आज चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची करणार पाहणी
एकनाथ शिंदे आज चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी करणार; प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाचा वापर
घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच... खवड्या डोंगरावरील प्रकरण दिसतंय इतकं सरळ
घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच... खवड्या डोंगरावरील प्रकरण दिसतंय इतकं सरळ नाही, कुणालच्या आत्यानं जे सांगितलं ते...
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील
धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील दुर्घटना प्रकरण वेगळ्याच वळणावर?
सीसीटीव्हीत... रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय...
सीसीटीव्हीत... रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय लेकीचा मृत्यू नेमका कशामुळे?
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं...
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं टायअप, यंदाचा गणेशोत्सव...
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद,
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद, प्रमुख तीन मागण्या काय?
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्ट्रभरात... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ