AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना... खवड्या डोंगरावरील दुर्घटना प्रकरण वेगळ्याच वळणावर?

धक्कादायक! बायकोमुळे मुरलीधरनं चक्क आई-वडिलांना… खवड्या डोंगरावरील दुर्घटना प्रकरण वेगळ्याच वळणावर?

| Updated on: Aug 23, 2026 | 1:55 PM
Share

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात खवड्या डोंगरावर मुलाला आत्महत्येपासून वाचवताना आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मुलाचाही जीव वाचू शकला नाही. या हृदयद्रावक घटनेने चांदगुडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियांना अश्रू अनावर झाले असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात खवड्या डोंगरावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. आपल्या पोटच्या मुलाला जीव देण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मुलाचाही जीव वाचू शकला नाही. चांदगुडे कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दूर गावाकडे राहणाऱ्या कुणालच्या आजी- आजोबांची अवस्था आता काळीज पिळवटून टाकणारी आहे. जीवाच्या आकांतात रडत रडत त्यांनी कुणालच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत. बायकोमुळे कुणालचा वडिल मुरलीधर यांने आम्हाला गावाकडे टाकेलं भेटला येत नसे. असं म्हणत त्यांनी टाहो फोडला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितले की तो खूप दिवसांनंतर भेटायला यायचा अन् त्यांच्या घरात गेल्या सहा वर्षांपासून कलह सुरु आहेत. त्याचा मुलाच्या मलावर परिणाम झाला असावा.

या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब शोकाकुल झाले आहे. मुलाच्या वियोगाने वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. त्यांच्या घरी आता केवळ आठवणी आणि अश्रू शिल्लक राहिले आहेत. चांदगुडे परिवार धनगर पिंपळगाव येथील रहिवासी असून, ट्रक चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मुलासोबत शेवटची भेट कधी झाली, याची आठवण करून देताना त्यांच्या वडिलांना आणि आईला आपले अश्रू आवरता आले नाहीत. जवळपास बावीस वर्षांपासून त्यांच्या मुलाचा कुटुंबाशी फारसा संपर्क नव्हता, असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. ही मन हेलावून टाकणारी घटना अनेकांना सुन्न करून गेली आहे.

Published on: Aug 23, 2026 01:55 PM

Follow Us