घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच… खवड्या डोंगरावरील प्रकरण दिसतंय इतकं सरळ नाही, कुणालच्या आत्यानं जे सांगितलं ते…
खवड्या डोंगरावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. आपल्या पोटच्या मुलाला आत्महत्येपासून वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मुलाचाही जीव वाचू शकला नाही. चांदगुडे कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खवड्या डोंगरावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. आपल्या पोटच्या मुलाला आत्महत्येपासून वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मुलाचाही जीव वाचू शकला नाही. चांदगुडे कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुरलीधरच्या बहिणींनीही म्हणजेच कुणालच्या आत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणाल्या की, तिला दीड वाजता घटनेची माहिती मिळाली. तिच्या मेहुण्यांनी तिला बिडकीनला जाण्यास सांगितले, पण ती थेट घाटीला गेली. मृत्यूनंतरच त्यांच्या भावाचे शरीर कुटुंबाला मिळाले, असा त्यांचा आरोप होता. त्यांच्या म्हातारपणाच्या आई-वडिलांचा आधार गेला, असे त्या म्हणाल्या. “तीन तास पोरगं उभं राहिलं वर तरी जीव नाही दिला त्यांनी, दोघा मायलेकांनी. त्याला आल्यावर त्यांनी तिघांनी संगच जीव दिला,” या शब्दांत त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. दुसऱ्या बहिणीने सांगितले की, तिचा भाऊ जवळपास बावीस वर्षांपासून त्यांच्यापासून दूर संभाजीनगरला राहत होता. केवळ चार महिन्यांपूर्वी मुलाच्या लग्नानंतर त्यांचा भावाशी संपर्क वाढला होता.
या चार महिन्यांत तो त्यांच्याशी अधिक बोलू लागला होता, मात्र संगीताला हे आवडत नव्हतं अशी चर्चा आहे. कुणालच्या आईने आत्याला उद्देशुन दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ बनवल्याच्याही चर्चा आहेत. या सर्व वादांचा मुलावर परिणाम झाला असावा असं अनेकांचं मत आहे. पण या घटनेच्या दिवशी त्यांचा फोन होऊ शकला नाही. त्याचा फोन ट्रकवरूनच आला होता आणि तो तिकडूनच दुसरीकडे निघुन गेला, असे त्यांना सांगण्यात आले. चांदगुडे कुटुंबाचा हा एकुलता एक मुलगा होता आणि तीन बहिणींचा आधार होता. या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबातील प्रमुख आधारस्तंभच गमावला आहे. संपूर्ण गाव आणि परिसर शोकसागरात बुडाला आहे. कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नसून, ही घटना कायम त्यांच्या मनावर कोरली जाणार आहे.
Published on: Aug 23, 2026 02:26 PM
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही

