कुणाच्याही कॉम्प्युटरची चौकशी करा, गृहमंत्रालयाकडून ‘या’ 10 एजन्सीना अधिकार
नवी दिल्ली : देशातील कुणाच्याही कॉम्प्युटरमधील डेटाची चौकशी तपासयंत्रणा करु शकतात. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे अधिकार देशातील 10 महत्त्वाच्या तपासयंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या कॉम्प्युटरची चौकशी तपासयंत्रणांना करायची असेल, त्या कॉम्प्युटरची चौकशी तपास यंत्रणा करु शकतात. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 69 कलमान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील महत्त्वाच्या तपासयंत्रणांना कुणाच्याही कॉम्प्युटरच्या चौकशीचे अधिकार दिले आहेत. जर […]

नवी दिल्ली : देशातील कुणाच्याही कॉम्प्युटरमधील डेटाची चौकशी तपासयंत्रणा करु शकतात. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे अधिकार देशातील 10 महत्त्वाच्या तपासयंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या कॉम्प्युटरची चौकशी तपासयंत्रणांना करायची असेल, त्या कॉम्प्युटरची चौकशी तपास यंत्रणा करु शकतात.
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 69 कलमान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील महत्त्वाच्या तपासयंत्रणांना कुणाच्याही कॉम्प्युटरच्या चौकशीचे अधिकार दिले आहेत. जर एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेवर देशविरोधी कारवाई करत असल्याची शंका आली किंवा ती व्यक्ती किंवा संस्था देशविरोधी कारवाईशी संबंधित असेल, तर त्यांच्या कॉम्प्युटरची चौकशीचे अधिकार या 10 तपासयंत्रणांना असेल.
हनीट्रॅप आणि देशविरोधी घटनांना थांबवण्यासाठी केंद्र सरकारच्या गृह खात्याने हे पाऊल उचललं आहे.
या तपासयंत्रणांना विशेषाधिकार?
- रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ)
- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो
- ईडी
- केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड
- महसूल गुप्तचर संचलनालय
- सीबीआय
- दिल्ली पोलिसांचे आयुक्त
- एनआयए
- जम्मू-कश्मीर, नॉर्थईस्ट आणि आसाम सिग्नल इंटेलीजियन्स संचलनालय
दरम्यान, तपासयंत्रणांना कुणाचेही कॉम्प्युटर तपासण्याचे अधिकार केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्याने, विविध स्तरातून चिंताही व्यक्त केली जात आहे.