AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार संजय सिंहांवर शाईफेक, याच शाईने इतिहास लिहू, ‘आप’चा योगींवर हल्लाबोल

आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह हाथरसच्या कुटुंबीयांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला.

खासदार संजय सिंहांवर शाईफेक, याच शाईने इतिहास लिहू, 'आप'चा योगींवर हल्लाबोल
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Oct 05, 2020 | 10:58 PM
Share

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह हाथरसच्या कुटुंबीयांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. घडलेल्या प्रकारामुळे आम आदमी पक्ष आक्रमक झाला असून योगी सरकारवर हल्लाबोल करत याच शाईने आम्ही इतिहास लिहून दाखवू, असा इशारा आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांनी दिला आहे.

पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे लोक हाथरसमध्ये जात आहेत. आप खासदार संजय सिंह देखील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. त्यावेळी कुटुंबीयांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली.

“संजय सिंह यांच्यावर शाई फेकून योगी सरकारने भ्याडपणाचा पुरावा दाखवला आहे. परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी याच फेकलेल्या शाईने आम्ही इतिहास लिहून दाखवू”, असं म्हणत आपचे दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा यांनी योगी सरकारला इशारा दिला.

https://www.facebook.com/raghavchadhaca/posts/2733920783493151

संजय सिंह यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार

हाथरस बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात सध्या असंतोष आहे. देशभरात उत्तर प्रदेश सरकारविरोधात निदर्शनं केली जात आहेत. देशातील विविध पक्ष पीडितेच्या कुटुंबियांना भेट देत त्यांचे सांत्वन करत आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह हे सुद्धा त्यांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. हा सगळा प्रकार अचानक घडल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

घडलेल्या प्रकारानंतर परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन आणि उत्तर प्रदेश सराकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आप पक्षाच्या उत्तर प्रदेश विभागाने, हा दिवस योगी आदित्यनाथ यांच्या शासनकाळातील काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल, असे म्हणत निषेध व्यक्त केला.

प्रदेश सरकारकडून सामान्यांचे दमन होतंय : आम आदमी पक्ष

तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून सामान्यांचे दमन केले जात असल्याचा आरोपही आप पक्षाने केला. हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता पोलिसांडून अडवले जात असून मारले जात आहे, असेही आप पक्षाचे कार्यकर्ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेश सरकार दोषींना वाचवू पाहत असल्याचा आरोपही आप पक्षाने केला आहे.

राहुल गांधी-प्रियांका गांधींना धक्काबुक्की

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेट दिली. यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्कबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

Hathras case | पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता, संजय सिंह यांच्यावर फेकली शाई

Hathras Gang Rape | उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

धक्कादायक ! देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...