Hathras case | पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता, संजय सिंह यांच्यावर फेकली शाई

आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह, हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला.(Ink thrown on Aam Aadmi Partys MP Sanjay Singh)

Hathras case | पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता, संजय सिंह यांच्यावर फेकली शाई
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 5:20 PM

लखनऊ : आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह, हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन  करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या हाथरसमध्ये जात आहेत. संजय सिंहदेखील पीडितेच्या कु़टुंबियांना भेटायला गेले होते. त्यावेळी कुटुंबियांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली. (Ink thrown on Aam Aadmi Partys MP Sanjay Singh while visiting the victim’s family in Hathras)

हाथरस बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात सध्या असंतोष आहे. देशभरात उत्तर प्रदेश सरकारविरोधात निदर्शनं केली जात आहेत. देशातील विविध पक्ष पीडितेच्या कुटुंबियांना भेट देत त्यांचे सांत्वन करत आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह हे सुद्धा त्यांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. हा सगळा प्रकार अचानक घडल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

घडलेल्या प्रकारानंतर परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन आणि उत्तर प्रदेश सराकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आप पक्षाच्या उत्तर प्रदेश विभागाने, हा दिवस योगी आदित्यनाथ यांच्या शासनकाळातील काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल, असे म्हणत निषेध व्यक्त केला. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून सामान्यांचे दमन केले जात असल्याचा आरोपही आप पक्षाने केला. हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता पोलिसांडून अडवले जात असून मारले जात आहे, असेही आप पक्षाचे कार्यकर्ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेश सरकार दोषींना वाचवू पाहत असल्याचा आरोपही आप पक्षाने केला आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेट दिली. यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्कबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

Hathras Gang Rape | उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

धक्कादायक ! देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल

(Ink thrown on Aam Aadmi Partys MP Sanjay Singh while visiting the victim’s family in Hathras)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.