मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लघुशंकेसाठी उतरलेल्या मित्रांवर टेम्पो उलटला, 5 जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. यात 5 मोटारसायकल स्वारांचा मृत्यू झाला, तर 1 जण जखमी झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लघुशंकेसाठी उतरलेल्या मित्रांवर टेम्पो उलटला, 5 जणांचा मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. यात 5 मोटारसायकल स्वारांचा मृत्यू झाला, तर 1 जण जखमी झाला आहे (Accident on Mumbai Pune Express Way). 3 बाईकवरील 6 प्रवासी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास अलिबागहून पुण्यातील तळेगावकडे जात होते. यावेळी प्रवासात ते बोरघाटातील खोपोली येथे मोटारसायकल बाजुला लावून लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी पुण्याकडून मुंबईकडे जाणार टेम्पो अवघड वळणावर एक्स्प्रेस वेवर वळताना पलटी झाला आणि थेट या प्रवाशांच्या अंगावर आला. यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही अंतरावर असलेला बालाजी हरिश्चंद्र भंडारी (35) हा किरकोळ जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी काही काळ वाहतूक थांबवत तात्काळ मदत कार्य केलं. पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त बाईकस्वारांना टेम्पो खालून काढलं. मात्र, टेम्पोमधील मालाच्या गोण्या अंगावर पडल्याने यातील 5 जणांच्या जागीच मृत्यू झाला. जखमीला खोपोली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातास्थळी महामार्ग पोलिस, जिल्हा वाहतूक पोलिस आणि अपघातग्रस्त मदत पथकाने तात्काळ मदतकार्य केलं.

या अपघातात अमोल बालाजी चिलमे (29), निवृत्ती उर्फ अर्जून राम गुंडाळे (31), गोविंद नलवाड (35), प्रदिप प्रकाश चोले (31), नारायण राम गुंडाळे (27) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. खोपोली पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Accident on Mumbai Pune Express Way

Published On - 7:52 am, Mon, 2 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI