Sana Khan | धर्माचा मार्ग अवलंबत मनोरंजन विश्वाला ‘अलविदा’ म्हटलेल्या सलमानच्या अभिनेत्रीचा ‘निकाह’!

| Updated on: Nov 21, 2020 | 7:12 PM

सलमान खानची सहकलाकार, बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री सना खान लग्न बंधनात अडकली आहे. सना खान सुरतमध्ये विवाहबद्ध झाली आहे.

Sana Khan | धर्माचा मार्ग अवलंबत मनोरंजन विश्वाला ‘अलविदा’ म्हटलेल्या सलमानच्या अभिनेत्रीचा ‘निकाह’!
Follow us on

मुंबई : सलमान खानची सहकलाकार, बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री सना खान (Sana Khan) लग्न बंधनात अडकली आहे. सना खान सुरतमध्ये विवाहबद्ध झाली आहे. सनाच्या नवऱ्याचे नाव मुफ्ती अनस (Mufti Anas) आहे. तो गुजरातचा एक सुप्रसिद्ध व्यापारी आहे. ‘बिग बॉस 14’चा स्पर्धक एजाज खान याने अनस आणि सना यांची पहिली भेट घडवली होती. सनाच्या लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (Actress Sana Khan ties knot with businessman Mufti Anas).

सानाने हिजाबसह सुंदर भरतकाम केलेले पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर, तिच्या नवऱ्याने देखील त्याच कपड्यांशी मिळते-जुळते कपडे परिधान केले होते. मुफ्ती अनसने पांढर्‍या रंगाचा कुर्ता पायजामा परिधान केला होता. या नवीन जोडप्याने त्यांच्या कुटूंबासह केक कापत लग्न सोहळा साजरा केला आहे.

अभिनय क्षेत्राला ‘अलविदा’

‘बिग बॉस’ची उपविजेती आणि सलमान खानची सह-अभिनेत्री सना खानने (Sana Khan) आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ‘बिग बॉस’ गाजवल्यानंतर ती सलमानसह ‘जय हो’ या चित्रपटात झळकली होती. मात्र, एका पोस्टमुळे आता तिच्या चाहत्यावर्गाला चांगलाच धक्का बसला होता. अभिनेत्री सना खानने चित्रपट सृष्टीला (Film Industry) ‘अलविदा’ म्हणत, धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहीत तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती (Actress Sana Khan ties knot with businessman Mufti Anas).

सोशल मीडियावर पोस्ट करत सनाने (Sana Khan) म्हटले की, ‘सगळ्या बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, यापुढे चित्रपट सृष्टीत कुठल्याही कामासाठी मला बोलवण्यात येऊ नये. आतापर्यंतच्या सहकार्यासाठी खूप खूप आभार’. सनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याचबरोबर तिचे नाराज चाहते कमेंट्स करून प्रश्न विचारत आहेत. तिने असा निर्णय का घेतला याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. यावरही तिने उत्तर दिले आहे.

आता मानवतेच्या शोधात धर्माच्या मार्गावर पुढचा प्रवास!

‘हे आयुष्य प्रत्यक्षात मृत्यूनंतरचे जीवन सुधारण्यासाठी आहे. आणि जेव्हा माणूस विधात्याच्या आज्ञेनुसार जगेल तेव्हा, त्याचे जीवन अधिक चांगले होईल. केवळ संपत्ती जमवणे याला जीवनाचे उद्दिष्ट बनवू नका. आपले ध्येय सिद्ध करा. मानवतेचे रक्षण करा. म्हणूनच, आज मी जाहीर करते की, आजपासून मी माझे ‘शोबीज’ (चित्रपट उद्योग) जीवन सोडणार आहे आणि माझ्या विधात्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा निश्चय करणार आहे,’ असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

(Actress Sana Khan ties knot with businessman Mufti Anas)