AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sana Khan | आता पुढचा प्रवास मानवतेच्या शोधात, सलमानच्या अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीला अलविदा!

अभिनेत्री सना खानने चित्रपट सृष्टीला (Film Industry) ‘अलविदा’ म्हणत, धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे.

Sana Khan | आता पुढचा प्रवास मानवतेच्या शोधात, सलमानच्या अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीला अलविदा!
| Updated on: Oct 09, 2020 | 11:57 AM
Share

मुंबई :बिग बॉस’ची उपविजेती आणि सलमान खानची सह-अभिनेत्री सना खानने (Sana Khan) आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ‘बिग बॉस’ गाजवल्यानंतर ती सलमानसह ‘जय हो’ या चित्रपटात झळकली होती. मात्र, एका पोस्टमुळे आता तिच्या चाहत्यावर्गाला चांगलाच धक्का बसला आहे. अभिनेत्री सना खानने चित्रपट सृष्टीला (Film Industry) ‘अलविदा’ म्हणत, धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहीत तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (Actress Sana Khan says goodbye to film Industry)

सोशल मीडियावर पोस्ट करत सनाने (Sana Khan) म्हटले की, ‘सगळ्या बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, यापुढे चित्रपट सृष्टीत कुठल्याही कामासाठी मला बोलवण्यात येऊ नये. आतापर्यंतच्या सहकार्यासाठी खूप खूप आभार’. सनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याचबरोबर तिचे नाराज चाहते कमेंट्स करून प्रश्न विचारत आहेत. तिने असा निर्णय का घेतला याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. यावरही तिने उत्तर दिले आहे.

आता मानवतेच्या शोधात धर्माच्या मार्गावर पुढचा प्रवास!

‘हे आयुष्य प्रत्यक्षात मृत्यूनंतरचे जीवन सुधारण्यासाठी आहे. आणि जेव्हा माणूस विधात्याच्या आज्ञेनुसार जगेल तेव्हा, त्याचे जीवन अधिक चांगले होईल. केवळ संपत्ती जमवणे याला जीवनाचे उद्दिष्ट बनवू नका. आपले ध्येय सिद्ध करा. मानवतेचे रक्षण करा. म्हणूनच, आज मी जाहीर करते की, आजपासून मी माझे ‘शोबीज’ (चित्रपट उद्योग) जीवन सोडणार आहे आणि माझ्या विधात्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा निश्चय करणार आहे,’ असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Actress Sana Khan says goodbye to film Industry)

सना खान अभिनयासोबतच उत्तम नृत्यदेखील करते. याशिवाय ती मॉडेलिंगदेखील करायची. फॅशन लूक आणि अभिनय कौशल्य यामुळे फार कमी वेळात तिने चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान मिळवले होते. तिने 50 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे.

सनाने 2005 मध्ये ‘ये है हाय सोसायटी’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’च्या 6व्या पर्वात दिसली होती. याच कार्यक्रमामुळे तिला सलमान खानचा ‘जय हो’ चित्रपटदेखील मिळाला होता. यानंतर ती चित्रपट सृष्टीतून गायब झाली होती. आता तिने पोस्ट करत चित्रपट सृष्टी सोडत असल्याचे जाहीर केले आहे.

(Actress Sana Khan says goodbye to film Industry)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.