अरे, ते मासे कुठले आहेत? कायतरी तिसरंच व्हायचं: अजित पवार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

बारामती (पुणे): उजनी धरणाचं पाणी विषारी आहे. पाणी पिताना आणि मासे खाताना सावधानता बाळगा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हॉटेलमालकाला दिला. बारामतीत आज अजित पवार यांच्या उपस्थितीत एका हॉटेलचं उदघाटन झालं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांची करमणूक केली. उजनी धरणातलं पाणी विषारी असल्याचं समोर आलंय. सोलापूर विद्यापीठानं हे पाणी […]

अरे, ते मासे कुठले आहेत? कायतरी तिसरंच व्हायचं: अजित पवार
Follow us on

बारामती (पुणे)उजनी धरणाचं पाणी विषारी आहे. पाणी पिताना आणि मासे खाताना सावधानता बाळगा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हॉटेलमालकाला दिला. बारामतीत आज अजित पवार यांच्या उपस्थितीत एका हॉटेलचं उदघाटन झालं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांची करमणूक केली.

उजनी धरणातलं पाणी विषारी असल्याचं समोर आलंय. सोलापूर विद्यापीठानं हे पाणी सतत प्यायल्यानं कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता वर्तवली आहे. याचाच दाखला देत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनीचं पाणी आणि मासे खाताना सावधानता बाळगण्याचा सल्ला  दिला.  यावेळी बोलताना त्यांनी एका हॉटेल व्यावसायिकाला मासे कुठून आणतो असंही  विचारलं. उजनीचे मासे आणू नका, नाहीतर तिसरंच काहीतरी होईल, असं त्यांनी खास शैलीत सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अजित पवार म्हणाले, “अरे ते परवा आम्ही वाचलं, त्या उजनीचं पाणी विषारी झालं म्हणून..मासे कुठले आहेत? कायच्या काहीतरी तिसरंच व्हायचं. ते मासाबिसा विहीर-बीर तिकडनं आणत चला. माणसं बातम्या वाचतात. मी तर आश्चर्यचकीत झालो”

याचवेळी अजित पवारांना समोरच उपस्थित असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला मासे उजनीचे तर नाहीत ना असा सवाल केला. उजनीचे मासे न आणता इतर नद्यांचे मासे आणण्याचा सल्लाही दिला. एकूणच उजनीच्या माशावरुन अजितदादांनी आपल्या खास शैलीत दिलेल्या सल्ल्यावरुन उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.