रोमान्सच्या राजधानीत कंडोमची विक्री घटली, मंदीचा फटका

| Updated on: Sep 20, 2019 | 11:03 AM

औषध निर्मिती कंपन्यांच्या मते, कंडोम (condom sales down) आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.

रोमान्सच्या राजधानीत कंडोमची विक्री घटली, मंदीचा फटका
Follow us on

ब्यूनस आयर्स (अर्जेंटिना) : रोमान्सची राजधानी अशी जगभरात ओळख असलेल्या अर्जेंटिनालाही मंदीचा फटका बसला आहे. चलनाचा घटता दर आणि वाढत्या महागाईची छळ अर्जेंटिनालाही बसत आहे. औषध निर्मिती कंपन्यांच्या मते, कंडोम (condom sales down) आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं असून, त्यामध्ये अर्जेंटिनात कंडोमच्या (condom sales down) विक्रीत 8 टक्के घट झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

अर्जेंटिना दक्षिण अमेरिकेची सर्वात  मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र अर्जेंटिनाचं चलन पेसोमध्ये डॉलरच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे वर्षाअखेरपर्यंत त्यांची अर्थव्यवस्था 2.6 टक्के घसरण्याची चिन्हं आहेत. अर्जेंटिना आधीच 50 टक्के वार्षिक महागाई दराचा सामना करत आहे.

मंदीमुळे देशात कार, दारु आणि मटण विक्रीतही घट झालीच आहे. त्यात आता कंडोमचाही समावेश झाला आहे. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांची विक्रीही घटली आहे.

कंडोम निर्मितीसाठी आवश्यक सामुग्री आयात केली जाते. मात्र चलनाचं अवमूल्यन झाल्याने आयातीवर परिणाम झाला. कंडोमच्या सामुग्रीचे दर वर्षाच्या सुरुवातील 36 टक्क्यांनी वाढले होते.

ट्यूलिपन आणि जेंटलमेन या कंडोम ब्रँडची निर्मिती करणारी कंपनी कोपेल्कोचे अध्यक्ष फिलिप कोपेलोवित्स यांच्या मते, “अर्जेंटिनामध्ये कंडोम निर्मितीचं साहित्य आयात होतं. आता देशाचं चलन ढासळल्यामुळे आयातीला फटका बसला आहे. शिवाय गर्भनिरोधक गोळ्यांचीही विक्री घटली आहे. देशातील जवळपास 1 लाख 44 हजार महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेणं बंद केलं आहे”

आरोग्यासाठी हानीकारक

तज्ज्ञांच्या मते, विक्री घटणं याला आर्थिक कारण जबाबदार असलं, तरी त्याचा शारीरिक परिणाम होण्याची भीती आहे. एचआयव्हीसारख्या रोगाचा धोका वाढण्याची चिन्हं आहेत.