एक दिवस संपाचा परिणाम, 5 दिवस बँका बंद राहणार

एक दिवस संपाचा परिणाम, 5 दिवस बँका बंद राहणार
एसबीआयने ग्राहकांना दिली ही सुविधा; घरबसल्या एका क्लिकवर डाऊनलोड करा एफडी व्याज प्रमाणपत्र

मुंबई : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने संपाचा इशारा दिला आहे. 21 डिसेंबरला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत, मात्र त्याचा परिणाम पुढचे पाच दिवस होणार आहे. बँक कर्मचाऱ्यांचा संप आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे बँका 5 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर बँकेचं कामकाज करायचं असेल, तर 20 डिसेंबरपूर्वीच करावं लागेल.

वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बँकांकडून हे संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

जर बँक कर्मचाऱ्यांनी 21 डिसेंबरला संप केला, तर त्या दिवशी बँका बंद राहतीलच, शिवाय 22 डिसेंबरला चौथा शनिवार आणि 23 डिसेंबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर सोमवारी 24 डिसेंबरला बँका उघडतील, पण सलग तीन दिवस बँका बंद असल्याने तुम्हाला मोठ्या गर्दीचा सामना करावा लागू शकतो. त्यानंतर 25 डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त सुट्टी आहे, तर 26 डिसेंबरला युनायटेड फोरमने पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 21 ते 26 डिसेंबरपर्यंत 24 डिसेंबर वगळता बँका बंद राहणार आहेत.

जर या काळात बँका बंद राहिल्यास तुमची अनेक कामे खोळंबू शकतात. चेक क्लिअरन्स होण्यासही वेळ लागू शकतो. बँकांना सुट्टी असली तरी एटीएमध्ये पैसे भरले जाऊ शकतात. पण पाच दिवस बँका बंद राहिल्याने एटीएममध्ये पैशांची कमतरताही भासू शकते. बँका बंद असल्याने तुम्हाला एटीएममध्ये गर्दीचा सामना करावा लागू शकतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI