आमदाराच्या बाईकवर बसून मंत्री बांधावर, अब्दुल सत्तारांकडून नुकसानीची अनोखी पाहणी

अब्दुल सत्तार हे मोटारसायकलवरून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आणि शेतकऱ्यांना धीर दिला. | Abdul Sattar

आमदाराच्या बाईकवर बसून मंत्री बांधावर, अब्दुल सत्तारांकडून नुकसानीची अनोखी पाहणी
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 3:26 PM

उस्मानाबाद: राज्यातील प्रमुख नेत्यांकडून सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या राज्यातील ग्रामीण भागांची पाहणी केली जात आहे. प्रमुख नेत्यांपाठोपाठ आता स्थानिक नेत्यांनीही शेतकऱ्यांना भेटून त्यांची परिस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोटार सायकलवरून फिरत अतिवृष्टीची पाहणी करायला सुरुवात केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिथे मोठ्या गाड्यांचा ताफा जाऊ शकत नाही अशा भागात अब्दुल सत्तार मोटार सायकल घेऊन प्रवास करत आहेत. (Abdul Sattar travelling on bike to meet farmers in Osmanabad)

यावेळी स्थानिक आमदार कैलास पाटील यांनी मोटारसायकल चालवली आणि अब्दुल सत्तार हे मोटारसायकलवरून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आणि शेतकऱ्यांना धीर दिला.

यंदा मराठवाड्यात नेहमीच्या सरासरीपेक्षा 76 टक्के अधिक पाऊस झाला. गेल्या आठवड्यात झालेला परतीचा पाऊस इतका जोरदार होता की शेतात उभी असलेली पिके आणि कापणी करून ठेवलेली पिके दोन्ही पावसाच्या पाण्यात भिजली आहेत. त्यामुळे गुरांना देण्यासाठी वैरणही शिल्लक राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, पंचनाम्यांशिवाय सरसकट मदत जाहीर करता येणार नाही, असे अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना सांगितले. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाच भरपाई मिळणार, असेही सत्तार यांनी शेतकऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या होत्या. यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी तात्काळ कोणतीही घोषणा करणार नाही, असे सांगितले होते. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना मदत नक्की देऊ. परंतु, सध्या नेमकी किती मदत द्यायची याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. पंचनामे झाल्यानंतरच प्रत्यक्षात मदत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीसांची नुकसान पाहणी सुरुच, अंधारात लाईट लावून शेतकऱ्यांशी चर्चा

गावकरी पलिकडे, फडणवीस अलिकडे, पूल वाहून गेल्याने शेतकरी पोहत-पोहत फडणवीसांच्या भेटीला

Abdul Sattar | लवकरच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत, अब्दुल सत्तारांचं शेतकऱ्यांना आश्वासन

(Abdul Sattar travelling on bike to meet farmers in Osmanabad)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.