VIDEO : भाजपच्या महिला सरपंचाला भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच मारहाण

सांगली : भाजपच्या महिला सरपंचाला भाजपच्याच ग्रामपंचायत सदस्यांकडून मारहाण झाल्याची घटना सांगलीत घडली आहे. शिराळा तालुक्यातील कांदे गावच्या ग्रामसभेत हा प्रकार घडला. घंटागाडी सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन ग्रामसभेत वाद झाला. हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. महिला सरपंच सुवर्णा पाटील यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला गेला आणि त्यांना मारहाण करण्यात आली. कांदे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सुवर्णा पाटील यांना […]

VIDEO : भाजपच्या महिला सरपंचाला भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच मारहाण
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

सांगली : भाजपच्या महिला सरपंचाला भाजपच्याच ग्रामपंचायत सदस्यांकडून मारहाण झाल्याची घटना सांगलीत घडली आहे. शिराळा तालुक्यातील कांदे गावच्या ग्रामसभेत हा प्रकार घडला.

घंटागाडी सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन ग्रामसभेत वाद झाला. हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. महिला सरपंच सुवर्णा पाटील यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला गेला आणि त्यांना मारहाण करण्यात आली.

कांदे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सुवर्णा पाटील यांना भाजपचे ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील यांच्यासह पाच जणांनी मारहाण केली.

दरम्यान, या सर्व प्रकरणी भाजपचे ग्रामपंचात सदस्य विश्वास पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :