नवरदेवाच्या डोळ्यादेखत नवरी पैसे-दागिने घेऊन पसार

गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा : तुम्हाला अभिनेत्री सोनम कपूरचा ‘डॉली की डोली’ हा चित्रपट माहिती आहे? या चित्रपटात ती वेगवेगळ्या शहरात जाऊन श्रीमंत पोरांना फसवून त्यांच्याशी लग्न करते आणि मग घरातील सर्व दागिने-पैसे घेऊन पळून जाते. तशीच काहीशी घटना बुलडाण्यातील डोणगांवमध्ये घडली. बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे राहणाऱ्या रसूल सय्यद गफूर यांनी जालनाच्या 25 वर्षीय […]

नवरदेवाच्या डोळ्यादेखत नवरी पैसे-दागिने घेऊन पसार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा : तुम्हाला अभिनेत्री सोनम कपूरचा ‘डॉली की डोली’ हा चित्रपट माहिती आहे? या चित्रपटात ती वेगवेगळ्या शहरात जाऊन श्रीमंत पोरांना फसवून त्यांच्याशी लग्न करते आणि मग घरातील सर्व दागिने-पैसे घेऊन पळून जाते. तशीच काहीशी घटना बुलडाण्यातील डोणगांवमध्ये घडली.

बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे राहणाऱ्या रसूल सय्यद गफूर यांनी जालनाच्या 25 वर्षीय आयशा उर्फ रेशमा परवीन हिचा विवाह अब्दुल शहा इस्माईल शाह बेराड यांच्याशी लावून दिला. अब्दुल शहा इस्माईल शाह बेराड हे गुजरात राज्यातील द्वारका जिल्ह्याचे राहिवासी आहेत. लग्न झल्यावर हा नवविवाहित जोडपं गुजरातला जाण्यासाठी निघालं. 17 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता ते अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेव्हा बाथरूमला जाते, असे सांगून आयशा बाहेर गेली. बराच वेळ होऊनही ती परतली नाही. त्यानंतर अब्दुल शहा इस्माईल शाह बेराड यांन आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. ज्यानंतर त्यांनी लगेच रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली.

आयशा ही अंगावरील दागिने आणि 34 हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाली होती.

पोलिसांनी लगेचच रसूल सय्यद गफूरला ताब्यात घेतले आणि त्याला डोणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.  पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांना आयशाची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी आयशाला पोलिसांनी जालना येथून अटक केली.

रेल्वे पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी आयशा उर्फ रेशमा परवीन, सय्यद रसूल सय्यद गफूर सह अन्य एकावर गुजरातच्या अब्दुल शहा यांची फसवणूक केल्या प्रकरणी कलम ४२०,३४, भांदवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांनी याआधी अशाप्रकारे कीती लोकांची फसवणूक केली आहे, याचाही पोलीस तपास घेत आहेत.

Non Stop LIVE Update
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.