देशातील टॉप 5 IPS, या अधिकाऱ्यांच्या नावाने तमाम गुन्हेगार घाबरतात

Top 5 IPS in India: लाखोंच्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात. परंतु यश मिळवणारे शेकडो असतात. मग आपल्या वेगळ्या कार्यकौशल्याने हे अधिकारी देशभर परिचित होतात. देशातील टॉप 5 आयपीएस अधिकारी कोण आहेत, ज्यांच्या नावाची दहशत गुन्हेगारांमध्ये आहे.

देशातील टॉप 5 IPS, या अधिकाऱ्यांच्या नावाने तमाम गुन्हेगार घाबरतात
देशातील टॉप आयपीएस
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 2:42 PM

संघ लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) आयएएस अन् आयपीएससाठी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार वर्षनुवर्ष रात्रंदिवस अभ्यास करतात. त्यानंतर यामध्ये यश मिळते. तीन टप्प्यात होणाऱ्या परीक्षेसाठी प्राथमिक ( प्रिलिम्स) त्यानंतर मुख्य परीक्षा होते. शेवटी मुलाखतीमधून अंतीम निवड होते. लाखोंच्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात. परंतु यश मिळवणारे शेकडो असतात. मग आपल्या वेगळ्या कार्यकौशल्याने हे अधिकारी देशभर परिचित होतात. देशातील टॉप 5 आयपीएस अधिकारी कोण आहेत, ज्यांच्या नावाची दहशत गुन्हेगारांमध्ये आहे.

IPS अंकिता शर्मा

अंकिता शर्मा 2018 बॅचची आयपीएस अधिकारी आहे. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली होती. त्यांना या परीक्षेत 203 वी रँक मिळाली होती. छत्तीसगडमधील नक्षलवादामुळे ओळखल्या जाणाऱ्या बस्तरमध्ये त्यांनी नक्षली ऑपरेशनची सूत्र सांभाळली. नक्षली ऑपरेशन सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकाऱ्या होत्या. त्या छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील आहेत. त्याच ठिकाणी त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

IPS मृदुल कच्छावा

मृदुल कच्छावा 2015 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील त्या रहिवाशी आहेत. त्यांनी जयपूर कॉमर्स कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतली. त्यानंतर सीए आणि सीएसचा अभ्यास केला. धौलपूरमध्ये पोलीस अधीक्षक असताना त्यांनी चंबलमधील बीहड येथील 45 डाकूंना पकडले होते. त्यांना चंबलच्या सिंघम म्हटले जाते.

हे सुद्धा वाचा

IPSलिपी सिंग

लिपी सिंग हे बिहार केडरचे 2016 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी 2015 मध्ये यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक 114 मिळवली. त्यांनी बिहारचे शक्तिशाली आमदार अनंत यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची ओळख लेडी सिंघम म्हणून झाली. आयपीएस लिपी सिंह यांचे पती सुहर्ष भगत हे 2015 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ती बिहारच्या नालंदा येथील रहिवासी असून तिने दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

आयपीएस नवनीत सिकेरा

जवळपास ६० चकमकींमध्ये IPS नवनीत सिकेरा यांचे नाव नोंदवले गेले आहे. ते 1996 च्या बॅचचे यूपी कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे झाले. त्याने आयआयटी दिल्लीतून बीटेकचे शिक्षण घेतले आहे. बी.टेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

आयपीएस शिवदीप लांडे

शिवदीप वामन राव लांडे हे बिहार केडर 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. जेव्हा ते पाटण्यात एसपी म्हणून कार्यरत होते तेव्हा पाटण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण खूप कमी झाले होते. लांडे यांची गणना देशातील सर्वात चांगल्या आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.

Non Stop LIVE Update
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं..
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं...
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार.
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल.