Sonu Sood यांचे WhatsApp खाते केले ब्लॉक; तुम्ही तर करत नाहीत ना ही चूक

व्हॉट्सॲप खाते बंद झाल्यावर सोनू सूद यांनी सोशल मीडियावर याविषयीची नाराजी जाहीर केली. त्यांनी WhatsApp ला लवकरात लवकर त्यांचा खाते सक्रिय करण्यास सांगितले आहे. अनेक लोकांना त्यांच्याकडून मदत हवी आहे, पण नंबर ब्लॉक केल्याने त्यांना संपर्क करता येत नाही.

Sonu Sood यांचे WhatsApp खाते केले ब्लॉक; तुम्ही तर करत नाहीत ना ही चूक
तुम्ही तर करत नाहीत ना ही चूक
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 8:33 AM

Sonu Sood WhatsApp Account Blocked : दक्षिणेसह बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सोनू सूद याचे व्हॉट्सॲप खाते बंद झाले आहे. कोरोना काळात त्याने सर्वसामान्यांना, गरजूंना मोठी मदत केली होती. पण व्हॉट्सॲप बंद झाल्याने अनेकांशी त्याला संपर्क करता येत नसल्याची माहिती त्यानेच सोशल मीडियावरुन दिली. सोनू सूदने त्याच्या इन्स्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन व्हॉट्सॲपविरोधात त्याचा संताप व्यक्त केला. सूदचा व्हॉट्सॲप क्रंमाक गेल्या 36 तासांपासून बंद आहे. त्याला लोकांच्या मदतीसाठी व्हॉट्सॲप अत्यंत उपयोगाचे ठरले होते. त्यामुळे लवकर त्याचे बंद खाते सक्रिय करण्याचे आवाहन त्याने केले आहे.

सोशल मीडियावर दिली माहिती

सोनू सूदने सोशल मीडियावर त्यांच्या बंद झालेल्या व्हॉट्सॲप खात्याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहे. व्हॉट्सॲपवर माझा नंबर बंद आहे. मी अनेकदा या अडचणीचा सामना केला आहे. मला वाटतं आता व्हॉट्सॲपने त्यांची सेवा अपग्रेड करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्याने केले आहे.

हे सुद्धा वाचा

या चुकांमुळे बंद होते व्हॉट्सॲप खाते

  1. व्हॉट्सॲपचे नियम आणि अटींचे उल्लंघन झाल्यावर कंपनी तुमचे व्हॉट्सॲप खाते बंद करते. जर तुम्ही या चुका केल्या तर तुमचे व्हॉट्सॲप खाते ब्लॉक, बॅन करण्यात येते.
  2. व्हॉट्सॲपसाठी कोणतेही थर्ड पार्टी ॲपचा वापर करु नका. GB WhatsApp, WhatsApp Plus आणि WhatsApp Delta सारख्या ॲपचा वापर केल्यास तुमचे व्हॉट्सॲप बंद होऊ शकते.
  3. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची खासगी माहिती घेऊन व्हॉट्सॲप खाते तुम्ही तयार केल्यास अशा खात्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही तुमच्या तपशीलासह व्हॉट्सॲपचा वापर करु शकतात. दुसऱ्याचा तपशील घेऊन तुम्ही व्हॉट्सॲप खाते तयार केल्यास ते बंद होऊ शकते.
  4. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला नाहक मॅसेज करणे पण महागात पडू शकते. तुमचे खाते ब्लॉक होऊ शकते. ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही, त्याला वारंवार मॅसेज करणे टाळा. अज्ञात व्यक्तीला वारंवार मॅसेज पाठवणे, त्रास देणे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन मानण्यात येते.
  5. जर तुमचा व्हॉट्सॲप क्रमांक अनेक लोकांनी ब्लॉक केला असेल तर कंपनीकडे तुमच्या खात्याविषयी नकारात्मक संदेश जातो. कंपनीला वाटते या व्हॉट्सॲप क्रमांकावरुन स्पॅम अथवा खोटे मॅसेज पाठविण्यात येतात. त्यामुळे हा क्रमांक ब्लॉक करण्यात येतो.
  6. व्हॉट्सॲपवरुन बेकायदेशीर मॅसेज पाठवणे, अश्लील कंटेट वा धमकीचे मॅसेज पाठवणे हे नियमांचे उल्लंघन आहे. व्हॉट्सॲपच्या नियम, अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्यास व्हॉट्सॲप खाते बंद करण्याची कारवाई करण्यात येते.
Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.