मतदानाची शाई दाखवा आणि माशांवर ताव मारा, रत्नागिरीतील हॉटेलची ऑफर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

रत्नागिरी : भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका.. या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरु असतात. शिवाय वैयक्तिक पातळीवरही अनेकांकडून प्रयत्न केले जातात. प्रशासनाच्या प्रयत्नांना रत्नागिरीमध्ये काही व्यासायिकांनीही स्वतःहून पुढे होत साथ दिली आहे. मतदान केल्याची शाई दाखवा आणि बिलात 10 टक्के सूट मिळवा, अशी ऑफर एका हॉटेलने दिली […]

मतदानाची शाई दाखवा आणि माशांवर ताव मारा, रत्नागिरीतील हॉटेलची ऑफर
Follow us on

रत्नागिरी : भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका.. या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरु असतात. शिवाय वैयक्तिक पातळीवरही अनेकांकडून प्रयत्न केले जातात. प्रशासनाच्या प्रयत्नांना रत्नागिरीमध्ये काही व्यासायिकांनीही स्वतःहून पुढे होत साथ दिली आहे. मतदान केल्याची शाई दाखवा आणि बिलात 10 टक्के सूट मिळवा, अशी ऑफर एका हॉटेलने दिली आहे.

कोकणात 23 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होतंय. या प्रक्रियेपासून अनेक वेळा मतदार लांब राहतात. अगदी अनेक सुशिक्षित नागरिकही मला काय करायचंय अशा भावनेतून मतदान करत नाहीत. अशा नागरिकांना जागृत करून त्यांनी मतदानचा आपला अधिकार बजावावा यासाठी प्रयत्न होत असताना रत्नागिरीच्या हॉटेल मत्स्यमने प्रशासनाबरोबर मतदाराला अनोखी साद घातली आहे. 23 तारखेपासून तुम्ही मतदान केलं केलं की त्या दिवसापासूनच पुढील आठ दिवस या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

मतदान हा जसा प्रत्येकाचा अधिकार आहे तसा ते प्रत्येकाचं कर्तव्यही आहे. तुमचं एक एक मत या देशाचा भविष्य घडवण्यासाठी महत्वाचे आहे. याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. सोशल मीडियावर मत्स्यमने याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियातून त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

अनेक लोकांनी मत्स्यमची ही पोस्ट शेअर केली आहे. तर अनेकांनी आम्ही मतदान तर करूच, पण तुमच्याकडे येऊन तुमच्या प्रयत्नांनाही दाद देऊ अशा कमेंट सोशल मीडियावर येत आहेत. त्यामुळे मतदान केल्यानंतर कोकणातल्या चमचमीत माशांवर तुम्ही ताव मारू शकता. अट फक्त ऐवढीच की मतदान करा…आणि या ताव मारलेल्या जेवणावर तुम्हाला दहा टक्के सूट मिळेल.

मतदानानंतर पुढील आठ दिवस मत्स्यम हॉटेलमध्ये मतदारराजाला हा डिस्काऊंट मिळणार आहे. व्हेज आणि नॉन व्हेज जेवणावर ही सूट मिळवता येणार असल्याने निवडणुकीच्या राजकीय नेत्यांच्या घोषणांच्या धामधुमीत मत्स्यमची ही लोकशाही सबळ करण्याची घोषणाही चांगलीच चर्चेत आली आहे.