AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल निवडणुका जाहीर होताच आज ठाकरे गटाला मोठं भगदाड… नवी मुंबईत मोठ्या घडामोडी; अखेर त्या चौघांनी…

Maharashtra Politics : राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 4 बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काल निवडणुका जाहीर होताच आज ठाकरे गटाला मोठं भगदाड... नवी मुंबईत मोठ्या घडामोडी; अखेर त्या चौघांनी...
Big Blow for uddhav ThackerayImage Credit source: Google
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Dec 16, 2025 | 7:40 PM
Share

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 15 जानेवारीला मतदान पार पडणार अजून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम अवघ्या एका महिन्यात पार पडणार आहे. अशातच आता निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांना रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहेत. त्याच बरोबर पक्षांतरालाही सुरुवात झाली आहे. अनेक नेत्यांनी आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 4 बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का

महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होताच नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी (एम के मढवी ) आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत 3 नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मढवी यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढवली होती. गणेश नाईक आणि विजय चौगुले यांच्या विरोधात ते ठाकरे गटाकडून मैदानात होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता.

शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार

मनोहर कृष्णा मढवी यांच्याकडे ऐरोली बेलापूर विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख पद आहे. ऐरोली मतदारसंघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या प्रवेशाने महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महत्वाचे म्हणजे एम के मढवी यांना 27 एप्रिल 2024 ला ठाणे खंडणी विरोधी पथकाने 2.5 लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली होती, मात्र आता ते शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत. एम के मढवी त्यांच्या सोबत विनया मढवी (पत्नी), करण मढवी (मुलगा) तसेच काँग्रेसच्या माजी नगरसेविका पूनम पाटील, त्यांचे पती मिथुन पाटील यांच्यासह इतर नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

उद्धव ठाकरेंना दोन दिवसात दोन धक्के

उद्धव ठाकरेंना दोन दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वॉर्ड क्रमांक 1 च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ‘माझ्या प्रभागात विकासाची कामे करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. तसेच अभिषेकच्या हत्येप्रकरणी गती येण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला’ असं तेजस्वी यांनी म्हटले आहे.

Follow Us
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार