AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut: जेन-झींना ‘गटरछाप’ म्हटल्याने कंगना यांना मारहाण? व्हिडीओमागील सत्य समोर

Kangana Ranaut : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांना मारहाण केल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेन-झींना गटरछाप म्हटल्याने त्यांच्यावर संतप्त लोकांना हल्ला केल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

Kangana Ranaut: जेन-झींना 'गटरछाप' म्हटल्याने कंगना यांना मारहाण? व्हिडीओमागील सत्य समोर
Kangana Ranaut Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 05, 2026 | 11:48 AM
Share

अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणौत या नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या जेन-झींना ‘गटरछाप’ म्हटल्याने त्यांच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. कंगना यांच्या अशा वक्तव्याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यावर घोळक्याने हल्ला केल्याचं दिसतंय. जेन-झींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कंगना यांच्यावर हा हल्ला झाल्याचं या व्हिडीओत म्हटलं गेलंय.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक महिला गाडीतून बाहेर पडत असताना जमाव तिच्यावर हल्ला करतो. गाडीबाहेर पाऊल ठेवताच तिथे उपस्थित असलेले लोक तिला मारहाण करू लागतात आणि तिचे केस ओढतात. मात्र या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे. या व्हिडीओमधील महिला कंगना राणौत नसून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या प्रणयिता दास आहेत. 30 जुलै रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी इथल्या कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Scroll Meme (@scrollmeme_02)

‘द टेलिग्राफच्या’ 31 जुलैच्या वृत्तामध्येही व्हायरल व्हिडीओमधील एका स्क्रीनशॉटचा वापर करण्यात आला होता. त्यानुसार, पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराप्रकरणी प्रणयिता दास या 30 जुलै रोजी जलपाईगुडी इथल्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली आणि पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. सीजेपी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कंगना राणौत यांना मारहाण झाल्याचं कोणतंही वृत्त समोर आलं नाही. यावरून स्पष्ट होत आहे की, व्हायरल व्हिडीओमधील हा दावा खोटा आहे.

कंगना यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या जेन-झी आंदोलकांना ‘जनरेशन गटर’ असं म्हटलं होतं. “जनरेशन झेडच्या महिला या पाश्चात्य संस्कृती स्वीकारलेल्या भारतीय महिला आहेत. त्या अभ्यासात कुशल नाहीत. त्या इतक्या कुरुप आणि भ्रष्ट आहेत की त्यांना घरकामसुद्धा सांभाळता येत नाही. तरीही त्या अमली पदार्थांचं सेवन करण्याचं, दारू पिण्याचं किंवा अनेक व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य अभिमानाने मिरवतात”, अशी टीका कंगना यांनी केली होती.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं