AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या समाजात असे सीन्स..; कंगना राणौत यांच्या ‘त्या’ चित्रपटावर आईने व्यक्त केलेली नाराजी, पुन्हा कधीच विचारलं नाही मत

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी 'गँगस्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या पहिल्या चित्रपटावर आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती, याविषयीचा खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.

आपल्या समाजात असे सीन्स..; कंगना राणौत यांच्या 'त्या' चित्रपटावर आईने व्यक्त केलेली नाराजी, पुन्हा कधीच विचारलं नाही मत
Kangana RanautImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 02, 2026 | 12:47 PM
Share

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. घरातून अभिनयक्षेत्रात काम करण्याची परवानगी नसतानाही त्यांनी धाडसी पाऊस उचलत मुंबई गाठली. करिअरच्या सुरुवातीलाच कंगना यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन काही निर्णय घेतले. ‘गँगस्टर’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारणं हा त्यापैकीच एक मोठा निर्णय होता. या पहिल्यावहिल्या चित्रपटात कंगना यांनी काही बोल्ड सीन्स दिले होते. आधीच करिअरच्या निवडीवरून आईवडिलांकडून प्रश्न उपस्थित होत असताना त्यांनी ‘गँगस्टर’सारखा निवडल्याने समस्येत आणखी भर पडली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी या चित्रपटावर त्यांच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती, याविषयीचा खुलासा केला.

आईवडिलांची प्रतिक्रिया

या मुलाखतीत कंगना यांनी सांगितलं की ‘गँगस्टर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर वडिलांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. तेव्हा त्यांनी आईला प्रश्न विचारला, “तुला काही समजलं का? तुला माझा चित्रपट कसा वाटला?” त्यावर त्यांची आई म्हणाली, “आपल्या समाजात तू अजूनही कमी वयाची आहेत, तरुण आहेस आणि त्यांनी चित्रपटात तुला असे सीन्स करायला भाग पाडलं.” आईची अशी प्रतिक्रिया ऐकून कंगना यांना वाईट वाटलं. “संपूर्ण चित्रपटात तू फक्त तेच सीन्स पाहिलेस का”, असा सवाल त्यांनी रागात आईला केला. आईवडिलांनी दिलेल्या अशा प्रतिक्रियेमुळे खूप वाईट वाटल्याचंही कंगना यांनी सांगितलं.

राष्ट्रीय पुरस्कारानंतर बदलले विचार

“समाजातील लोक काय बोलणार, आपली मुलगी कशा पद्धतीच्या चित्रपटांमध्ये काम करतेय, याचा ते विचार करत होते. त्यानंतर मी ठरवलं की यापुढे मी माझ्या कोणत्याच चित्रपटावर आईवडिलांच्या प्रतिक्रियेची किंवा त्यांच्या रिव्ह्यूची अपेक्षा करणार नाही. कारण ते आधीही चित्रपट बघत नव्हते”, असं कंगना यांनी स्पष्ट केलं. मात्र जेव्हा कंगना यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी करिअरच्या निर्णयाचा स्वीकार करण्यास सुरुवात केली.

याविषयी कंगना पुढे म्हणाल्या, “जेव्हा मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा ते खूप खुश होते. आमच्या मुलीचा राष्ट्रपतींनी सत्कार केला, या विचारानेच त्यांना खूप अभिमान वाटत होता. त्यांच्यासाठी तो खरा टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर जेव्हा मला पद्मश्री पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यापेक्षाही सर्वांत मोठा क्षण त्यांच्यासाठी होता.”

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल