AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जंतरमंतरवरील आंदोलनाची ठिणगी मुंबईत, छत्रपती शिवाजी पार्काला छावणीचं स्वरुप, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाची ठिणगी मुंबईत पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी पार्काला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे.

जंतरमंतरवरील आंदोलनाची ठिणगी मुंबईत, छत्रपती शिवाजी पार्काला छावणीचं स्वरुप, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू
abhijeet dipkeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 3:25 PM
Share

कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीनंतर आता मोर्चा मुंबईत वळवला आहे. दिल्लीत आंदोलन करण्याआधी पोलिसांनी हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.  दिल्लीत पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यापासून रोखलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या तीन प्रमुख नेत्यांनाही विमानातून ताब्यात घेतलं. या तिन्ही नेत्यांना 24 तास ताब्यात ठेवल्यानंतर सुटका केली. आता तिन्ही नेत्यांची सुटका झाल्यानंतर सीजेपीने मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कात आंदोलनाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्काला छावणीचं स्वरुप आलं आहे. पोलिसांकडून सीजेपी कार्यकर्ते, आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीकडून छत्रपती शिवाजी पार्क परिसरात 4 वाजता पार्टीचे आंदोलन होणार आहे.   आंदोलन होण्याआधीच छत्रपती शिवाजी पार्क परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झालं आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  आंदोलन करण्याआधी पोलीस आंदोलंकाना ताब्यात घेण्याच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील सुरू आहे.

अंजिक्य शिंदे यांनी ट्विट करत काय म्हटलं?

सीजेपीच्या अंजिक्य शिंदे यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. याबद्दल प्रत्येक भारतीयामध्ये संताप आहे. काल दिल्ली आणि देशभरात ज्या प्रकारे हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्या कृतीला नक्कीच आव्हान दिले जाईल. या हुकूमशाहीविरुद्ध देशभर निदर्शने सुरू झाली आहेत.  मुंबईत आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथील ‘टी जंक्शन’ (T Junction) येथे आंदोलक शांततापूर्णरीत्या एकत्र जमतील. लवकरच इतर शहरांमध्येही अशी आंदोलने होतील. आमच्या नेत्यांना अटक करून आणि लोकशाहीची गळचेपी करून सरकारने मोठी चूक केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे’.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु