AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmed Patel | काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल आयसीयूमध्ये

अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाल्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Ahmed Patel | काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल आयसीयूमध्ये
| Updated on: Nov 15, 2020 | 5:06 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांची प्रकृती खालावली आहे. कोव्हिड संसर्गानंतर पटेल यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अहमद पटेल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Congress leader Ahmed Patel in ICU weeks after being infected with coronavirus)

अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती पटेल यांनी एक ऑक्टोबरला ट्विटरवरुन दिली होती. तेव्हापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची रवानगी मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये केल्याची माहिती कुटुंबीयांनी रविवारी दिली.

“अहमद पटेल यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगू इच्छितो, की आमचे वडील काही आठवड्यांपूर्वी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना पुढील उपचारांसाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आयसीयूमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे” असे अहमद यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विटरवरुन सांगितले.

“अहमद पटेल यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख सुरु आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करा” अशी विनंतीही फैजल पटेल यांनी केली.

कोण आहेत अहमद पटेल?

अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि सल्लागार आहेत. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली आहे. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना आहे.

जेव्हा पक्षहिताचा प्रश्न येतो, तेव्हा सोनिया गांधी या राहुल गांधींपेक्षाही अहमद पटेल यांच्यावर अवलंबून असतात असं म्हटलं जातं. अहमद पटेल हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून पक्षात आहेत. 1977 मध्ये काँग्रेस तोंडघशी पडलेली असताना संसदेत पोहचणाऱ्या मोजक्या काँग्रेस खासदारांमध्ये अहमद पटेल यांचा समावेश होतो.

1980 मध्ये काँग्रेसने पुनरागमन केलं, तेव्हा इंदिरा गांधींनी अहमद पटेलांना कॅबिनेट मंत्रिपद ऑफर केलं, मात्र पटेल यांनी पक्षबांधणीला प्राथमिकता दिली होती.

अहमद पटेल हे तीन वेळा लोकसभेवर, तर चार वेळा राज्यसभेवर खासदारपदी निवडून आले आहेत.

संबंधित बातम्या :

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं नाव

(Congress leader Ahmed Patel in ICU weeks after being infected with coronavirus)

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.