काँग्रेस खासदार अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत पटेल यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.

काँग्रेस खासदार अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत पटेल यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. (Rajyasabha Mp Ahmed Patel tested positive for corona)

पटेल यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी स्वतःला आयसोलेट करावं.

दरम्यान मंगळवारी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी स्वतः ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. त्यांच्या पत्नी उषा नायडू यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर व्यंकय्या नायडू होम क्वारन्टीन झाले आहेत.

भारतात आतापर्यंत 63,12,584 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 98,708 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52,73,201 बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

17 जुलै रोजी देशात 10 लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 7 ऑगस्ट रोजी ही संख्या वाढून 20 लाख इतकी झाली. 23 ऑगस्ट रोजी त्यामध्ये अजून 10 लाख रुग्णांची भर पडली. 5 सप्टेंबर रोजी देशातील कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली.

देशाचा रिकव्हरी रेट हा 82.58 टक्के इतका आहे. देशाचा रिकव्हरी रेट जगभरात सर्वात अधिक आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मृत्यूदर घटून 1.57 टक्के इतका झाला आहे.

संबंधित बातम्या

Manish Sisodia | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण, प्लेटलेट्स घटल्याने चिंता

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन

(Rajyasabha Mp Ahmed Patel tested positive for corona)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *