AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manish Sisodia | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण, प्लेटलेट्स घटल्याने चिंता

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात सिसोदिया यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Delhi Deputy CM Manish Sisodia is suffering from Dengue)

Manish Sisodia | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण, प्लेटलेट्स घटल्याने चिंता
| Updated on: Sep 24, 2020 | 11:21 PM
Share

दिल्ली: नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सिसोदिया यांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत असल्याची माहिती दिल्लीच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे. (Delhi Deputy CM Manish Sisodia is suffering from Dengue)

ANI वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार “मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्या रक्तातील प्लेटलेटस कमी होत आहेत”, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. ताप आणि शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे सिसोदिया लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सिसोदिया यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

बुधवारी मनीष सिसोदिया यांची बुधवारी(23 सप्टेंबर) दुसऱ्या वेळी कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. नवी दिल्ली विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन 14 सप्टेंबरला आयोजित करण्यात आले होते.  या अधिवेशनाला मनीष सिसोदिया हजर राहिले नव्हते. सिसोदिया यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी स्वत:ला विलगीकरण करुन घेतले होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील आरोग्य मंत्री संत्येंद्र जैन यांना कोरोना संसर्ग झाला होता. मनीष सिसोदिया हे कोरोना संसर्ग झालेले केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील दुसरे मंत्री आहेत. दरम्यान, नवी दिल्लीतील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 2 लाख 56 हजार 789 वर पोहोचली आहे.

संबधित बातम्या:

ONGC Blast | ONGC प्लान्टमधील सलग 3 स्फोटांनी सूरत हादरले, 4 किलोमीटरपर्यंतच्या इमारतींना हादरा, खिडक्यांच्या काचाही फुटल्या

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन

(Delhi Deputy CM Manish Sisodia is suffering from Dengue)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.