ONGC Blast | ONGC प्लान्टमधील सलग 3 स्फोटांनी सूरत हादरले, 4 किलोमीटरपर्यंतच्या इमारतींना हादरा, खिडक्यांच्या काचाही फुटल्या

इथे एका पाठोपाठ एक 3 भीषण स्फोट झाले. त्यानंतर आगीचे मोठमोठे लोळ उठले. या स्फोटाचा हादरा 3-4 किलोमीटरपर्यंत बसला.

ONGC Blast | ONGC प्लान्टमधील सलग 3 स्फोटांनी सूरत हादरले, 4 किलोमीटरपर्यंतच्या इमारतींना हादरा, खिडक्यांच्या काचाही फुटल्या

सूरत : गुजरातच्या सूरतमधील तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) मध्ये बुधवारी (Blast At ONGC Hariza Plant Surat) रात्री उशिरा अचानक आग लागली. इथे एका पाठोपाठ एक 3 भीषण स्फोट झाले. त्यानंतर आगीचे मोठमोठे लोळ उठले. या स्फोटाचा हादरा 3-4 किलोमीटरपर्यंत बसला. सुरतच्या ONGC हजारिया प्लान्टमध्ये लागलेल्या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही (Blast At ONGC Hariza Plant Surat).

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ONGC प्लान्टमध्ये 3 स्फोट झाले. या स्फोटांची भीषणता इतकी होती की त्यांचा आवाज जवळपास 3-4 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. या स्फोटाचा हादरा दूरवरील इमारतींनाही बसला. इतकंच नाही तर अनेक इमारतींच्या खिडक्या तुटल्या आणि काचाही फुटल्या.

ONGC प्लान्टमधील आगीवर नियंत्रण

या घटनेनंतर ONGC ची अधिकृत प्रतिक्रियाही आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आगीवर नियंत्रण मिळालेलं आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

“रात्री उशिरा 3 वाजताच्या सुमरास या प्लान्टमध्ये एका पाठोपाठ एक 3 स्फोट झाले. त्यामुळे आग लागली. सध्या कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सध्या तिथल्या गॅस प्रेशरला कमी करण्याचं काम सुरु आहे”, अशी माहिती सूरतचे जिल्हाधिकारी डॉ. धवल पटेल यांनी दिली (Blast At ONGC Hariza Plant Surat).

संबंधित बातम्या :

Jammu and Kashmir | अतिरेक्यांचा बीडीसी अध्यक्षांवर गोळीबार, भूपिंदर सिंह यांचा जागीच मृत्यू

राजस्थानच्या चंबळ नदीत 30 जणांसह बोट बुडाली, 5 जणांचा मृत्यू, 10 जण बेपत्ता, दृश्ये कॅमेऱ्यात कैद

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *