Venkaiah Naidu Corona | उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोना संसर्ग

भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोना संसर्ग झाला आहे (Corona infection to Vice President M Venkaiah Naidu).

Venkaiah Naidu Corona | उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोना संसर्ग झाला आहे (Corona infection to Vice President M Venkaiah Naidu). त्यांनी ट्विटरवरुन अधिकृतपणे आज (29 सप्टेंबर) याबाबत माहिती दिली. नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर व्यंकय्या नायडू गृहविलगीकरणात (होम क्वारंटाईन) गेले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती नायडू यांच्या ट्विटमध्ये सांगण्यात आलं, “आज सकाळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नियमित कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी उषा नायडू यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्या स्वयंविलगीकरणात आहेत.”

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ट्विट करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या प्रकृती स्वाथ्यासाठी प्रार्थना केली आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील उपराष्ट्रपती यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

 संबंधित बातम्या :

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोना, मुख्यमंत्र्यांसह पवारांच्या धमकी प्रकरणाच्या तपासादरम्यान संसर्गाची शक्यता

Corona infection to Vice President M Venkaiah Naidu

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *