AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दादा मी प्रेग्नंट आहे' पोस्टरचा अर्थ समजला?

पुणे: मुंबईतल्या दादरप्रमाणेच पुण्यातही एक पोस्टर सध्या उत्सुकतेचा विषय ठरलं आहे. या पोस्टरवर ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ असं लिहिण्यात आलं आहे. हे पोस्टर नक्की काय आहे आणि कशासाठी आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. पण त्याबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. ‘दादा मी प्रेग्नंट आहे, असे पोस्टर्स मुंबई आणि पुण्यात लावले आहेत. मुंबई-पुण्यासारख्या शहरांना चर्चेला कोणतंही कारण पुरतं. […]

‘दादा मी प्रेग्नंट आहे' पोस्टरचा अर्थ समजला?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

पुणे: मुंबईतल्या दादरप्रमाणेच पुण्यातही एक पोस्टर सध्या उत्सुकतेचा विषय ठरलं आहे. या पोस्टरवर ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ असं लिहिण्यात आलं आहे. हे पोस्टर नक्की काय आहे आणि कशासाठी आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. पण त्याबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. ‘दादा मी प्रेग्नंट आहे, असे पोस्टर्स मुंबई आणि पुण्यात लावले आहेत. मुंबई-पुण्यासारख्या शहरांना चर्चेला कोणतंही कारण पुरतं. पुण्यात सध्या या पोस्टरनं सर्वांच लक्ष वेधलंय. अन् त्यावर चर्चाही सुरू आहे. गजबजलेल्या ठिकाणी लागलेलं हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलाय. ‘दादा मी प्रेग्नंट आहे’  असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. मुंबईतल्या दादरच्या प्रभादेवी भागातही हेच पोस्टर नागरिकांचं लक्ष्य वेधून घेतंय. आता पुण्यातील कर्वेरोड येथील डेक्कन टी पॉईंट येथे हे पोस्टर लागलंय. मात्र या होर्डिंगबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. ते कलाविश्वाशी संबंधित असल्याचं काही जणांचा तर्क आहे. मुंबई-पुणे-मुंबई सिनेमाची जाहिरात? या होर्डिंगबाबत अनेकजण तर्क लढवत आहेत, त्यापैकी एक तर्क म्हणजे ही मुंबई-पुणे-मुंबई सिनेमाची जाहिरात असू शकते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेला ‘मुंबई-पुणे-मुंबई3’ सिनेमाच्या दोन सिक्वेलनंतर आता तिसरा सिक्वेल येत आहे. हा सिनेमा येत्या 7 सात डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. त्यनुसार अभिनेत्री मुक्ती बर्वे प्रेग्नंट आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागात स्वप्नील आणि मुक्ता यांच्यातील केमेस्ट्री दाखवली होती. त्यानंतर सिक्वेल आला. त्यामध्ये  दोघांच्या लग्नाची बोलणी, रुसवा-फुगवा, दोन्हीकडील नातेसंबंध इत्यादींवर कथानक बेतलं होतं. आता तिसरा भाग येत आहे. ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं की, ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ सिनेमात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी साकारलेल्या जोडप्याच्या आयुष्यात बाळ येणार असतं आणि त्यासाठी मग हॉस्पिटल, काय खावं-काय नाही वगैरे सगळी धावाधाव तिसऱ्या भागात असल्याचे दिसते आहे.  त्यामुळे मुंबई- पुण्यातील पोस्टर्स हे या सिनेमाची जाहिरात तर नाही ना असे तर्क लढवले जात आहेत? ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

पाहा ट्रेलर:

साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी ‘शिवडे आय एम सॉरी’ असे जवळपास 400 होर्डिंग पुण्यात लागले होते. ते एका प्रेमवीरानं लावल्याचं नंतर उघड झालं. त्यानंतर आता ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ हे होर्डिंग चांगलंच गाजत आहे. मात्र या होर्डिंग्सबाबची नागरिकांची उत्सुकता प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ