‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

'मुंबई-पुणे-मुंबई 3' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘मुंबई-पुणे-मुंबई’ सिनेमाच्या दोन सिक्वेलनंतर आता तिसरा सिक्वेल येत आहे. येत्या 7 सात डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या मुख्य भूमिका आणि सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. त्यातच ट्रेलर रिलीज झाल्याने, प्रेक्षकांनी ट्रेलरवरही उड्या मारल्या. 24 […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : ‘मुंबई-पुणे-मुंबई’ सिनेमाच्या दोन सिक्वेलनंतर आता तिसरा सिक्वेल येत आहे. येत्या 7 सात डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या मुख्य भूमिका आणि सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. त्यातच ट्रेलर रिलीज झाल्याने, प्रेक्षकांनी ट्रेलरवरही उड्या मारल्या. 24 तासाच्या आत 2 लाख 66 हजारांचा टप्पा या सिनेमाच्या ट्रेलरने गाठला.

‘मुंबई-पुणे-मुंबई’ सिनेमाच्या पहिल्या भागात स्वप्नील आणि मुक्ता यांच्यातील केमेस्ट्री सगळ्यांनाच आवडली. पहिला भागाचे सगळ्यांनीच भरभरुन कौतुक केले. त्यानंतर सिक्वेल आला. त्यात तर प्रशांत दामलेंसह दिग्गज होते. दुसऱ्या भागात लग्नाची बोलणी, रुसवा-फुगवा, दोन्हीकडील नातेसंबंध इत्यादींवर कथानक बेतलं होतं. त्यानंतर आता तिसरा भाग येत आहे.

ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं की, ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ सिनेमात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी साकारलेल्या जोडप्याच्या आयुष्यात बाळ येणार असतं आणि त्यासाठी मग हॉस्पिटल, काय खावं-काय नाही वगैरे सगळी धावाधाव तिसऱ्या भागात असल्याचे दिसते आहे. या सिनेमातही स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, सुहास जोशी, प्रशांत दामलेंसह तगडी स्टारकास्ट असल्याने सिनेमा दमदार असेल, यात शंका नाही.

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांचा मराठीत स्वत:चा चाहतावर्ग असल्याने त्यांच्यामध्ये सिनेमाची उत्सुकता कमालीची दिसून येते आहे. मात्र, एकंदरीतच पहिल्या दोन भागांचा प्रतिसाद पाहता, या तिसऱ्या भागाबद्दल सुद्धा मराठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसते आहे.

पाहा ट्रेलर :

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें