डोक्यात वरवंटा घालून सासूचा खून, नंतर फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

डोक्यात वरवंटा घालून सासूचा खून, नंतर फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
प्रतिकात्मक फोटो

सुनेने सासूच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Daughter in law murder Mother-in-law)

Namrata Patil

|

Feb 19, 2021 | 11:48 PM

रायगड : सुनेने सासूच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्जत तालुक्यातील बेकरे गावात ही घटना घडली आहे. तारामती पांडूरंग कराळे (75) असे मृत सासूचे नाव आहे. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी आरोपी सूनेला ताब्यात घेतलं आहे. (Daughter in law murder Mother-in-law in raigad)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस स्टेशन हद्दीत बेकरे गाव आहे. या गावात कराळे कुटुंब राहतात. आज पहाटेच्या सुमारास तारामती कराळे या घरी झोपलेल्या होत्या. तर त्यांचे पती पांडुरंग कराळे लवकर उठून घराबाहेर पडले होते. यानंतर सासू झोपेत असल्याच्या फायदा घेत सुनेने घरातील वरवंटा सासूच्या डोक्यात घालून खून केला.

यानंतर ते सकाळी 6 च्या सुमारास पांडुरंग कराळे घरी परतले. त्यावेळी ते पत्नीला उठवण्यासाठी गेले असता, ही घटना समोर आली. तारामती यांच्या डोक्यात जबर मार लागला होता. डोक्यातून अतिरक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर सून योगिता कराळे ही घरातच फिनाईल प्यायलेल्या अवस्थेत आढळून आली आहे.

या घटनेबाबत सूनेला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान तारामती कराळे यांची नेमकी हत्या का केली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान आरोपी योगिता कराळे हिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर पती योगेश कराळे यांचा तीन वर्षापूर्वीच मृत्यू झाला आहे. (Daughter in law murder Mother-in-law in raigad)

संबंधित बातम्या : 

नाईट ड्युटीवर जाण्यास मनाई केल्याने शिवीगाळ, संतापलेल्या तिघांकडून चाकूने वार

कॉलेजला निघालेली तरुणी कालव्यात मृतावस्थेत, चुलतभावाने गळा दाबून संपवलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें