AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझ्या वागणुकीत सुधारणा कर, वडिलांच्या प्रश्नाने मुलीचा संताप, उकळतं तेल वडिलांवर ओतलं

एका मुलीने रागाच्या भरात कढईतील उकळते तेल वडिलांच्या अंगावर ओतल्याची घटना घडली (Daughter Pour boiling oil to father at Bhandara) आहे.

तुझ्या वागणुकीत सुधारणा कर, वडिलांच्या प्रश्नाने मुलीचा संताप, उकळतं तेल वडिलांवर ओतलं
| Updated on: Aug 20, 2020 | 8:24 PM
Share

भंडारा : ‘माता न तू वैरीणी’ ही म्हणं सर्वांनाच माहिती आहे. पण ‘मुलगी न तू वैरीणी’ असे म्हणण्याची वेळ एक वडिलांवर आली आहे. प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला हटकणे पित्याला महागात पडले आहे. भंडाऱ्यात एका संतापलेल्या मुलीने जन्मदात्यावर उकळते तेल टाकले आहे. त्यामुळे तिचे वडील 40 टक्के भाजले आहेत. (Daughter Pour boiling oil to father at Bhandara)

एका मुलीने रागाच्या भरात कढईतील उकळते तेल वडिलांच्या अंगावर ओतल्याची घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील चिचगांवात ही घटना घडली. या घटनेत तिचे वडील मनोज महादेव रामटेके (47) 40 टक्के भाजले. त्यांच्यावर भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मनोज रामटेके यांच्या 25 वर्षीय मुलीने 3 वर्षापूर्वी जवळच्या गावातील युवकासोबत प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून ती पतीसोबत त्याच्या गावी राहत होती. पण त्यानंतर घरगुती कारणामुळे दोघांमध्ये वादविवाद निर्माण झाले. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून ती माहेरी परत आली होती. मात्र काल रात्र तिचे आणि वडिलांसोबत भांडण झाले. त्या भांडणादरम्यान तिच्या वडिलांनी तिला प्रेमविवाह केल्यानंतर पतीला का सोडले? तुझ्या वागणुकीत सुधारणा कर, असे म्हटलं.

यावरुन संतापलेल्या मुलीने वडिलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कढईतील उकळते तेल टाकले. यात वडिलांचे डोके, संपूर्ण चेहरा, मान, छातीचा भाग, पाठ आणि दोन्ही खांदे असा एकूण 40 टक्के भाग जळला आहे. त्यानंतर लगेचच त्याला भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल केले गेले असून त्याच्यांवर उपचार सुरु आहे.

या घटनेनंतर ती मुलगी पळून गेली. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलीचा शोध सुरु केला. ती मुलगी साकोली येथे नातेवाईकांकडे सापडली. तिला अटक करत कोर्टात हजर केले असता दोन दिवसाच्या पीसीआर मिळाला.

सध्या शिक्षण आणि रोजगारावर कोरोना सावट असल्याने अनेक लोकांना घरी राहावे लागत आहे. त्यामुळे लोकांची चिड़चिड़ वाढत चालली आहे. त्यामुळे असे प्रसंग दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या घटनेनंतर कुणाला काही बोलावे की नाही हा मोठा प्रश्न समोर येऊन ठेपला आहे. (Daughter Pour boiling oil to father at Bhandara)

संबंधित बातम्या : 

वडापावच्या गाडीवरुन वाद, पिंपरीत 22 वर्षीय तरुणाची हत्या

पती आणि दोन मुलांची इंजेक्शन देऊन हत्या, महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपुरात खळबळ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.