जिवंत मतदाराला मृत दाखवलं, मतदारांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली!

बुलडाणा : मलकापूर येथील मतदान केंद्रावर जिवंत मतदारांना मृत दाखवल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे संतापलेल्या मतदारांनी मृत दाखवलेल्या मतदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत या घटनेचा निषेध केला. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा मतदान केंद्रावरुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर नेण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शहरात ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा चर्चेची ठरली असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. तिसऱ्या टप्प्याचे मतदान काल (23 एप्रिल) […]

जिवंत मतदाराला मृत दाखवलं, मतदारांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

बुलडाणा : मलकापूर येथील मतदान केंद्रावर जिवंत मतदारांना मृत दाखवल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे संतापलेल्या मतदारांनी मृत दाखवलेल्या मतदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत या घटनेचा निषेध केला. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा मतदान केंद्रावरुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर नेण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शहरात ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा चर्चेची ठरली असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

तिसऱ्या टप्प्याचे मतदान काल (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 14 जागांवर पार पडले. रावेर मतदारसंघातील मलकापूरमधील बुथ क्रमांक 166 वर रोहिदास नगर येथील हा प्रकार आहे. या मतदान केंद्रावर मतदार क्रमांक 521 श्रीकृष्ण संपत शेकोकार, मतदार क्रं. 640 मोहनसिंग चिंधू गणबास, दत्तनगर मधील मतदार क्रमांक 443 सौ.रजनी दिनकर जोशी यांसह जवळपास पन्नास जिवंत मतदारांना चक्क मृत दाखवले आहे. काही वेळातच ही घटना संपूर्ण शहरात चर्चेची ठरली.

या घटने संदर्भात सहाय्यक निवडणूक अधिकारी विंचनकर यांना संपर्क केला असता, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी बुथ क्रमांक 166 वरुन सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयावर डफडे वाजवून प्रतिकात्म अंत्ययात्रा काढली.

प्रतिकात्मक अंत्ययात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकताच पोलीस अधिकारी गिरीश बोबडे, शहर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पोलीस ताफ्यासह दाखल झाले. नगराध्यक्ष अँड हरीश रावळ यांनी जिवंत असलेल्या व्यक्तीला निवडणूक यादीतील नाव रद्द केल्याने तो मतदानापासून वंचित राहिला. यामुळे मतदार याद्या अद्यावत करुन ‘त्या’ बुथवर पुर्नमतदान घेण्याची मागणी केली.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.