AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, RCB Playoff : आरसीबीकडून प्लेऑफचा ‘लगान’ वसूल, यश दयाल खऱ्या अर्थाने ठरला ‘कचरा’

आयपीएल 2024 स्पर्धेच्या मधल्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल असं वाटत नव्हतं. कारण पहिला सामना गमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात यश मिळवलं. त्यानंतर सलग सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण त्यानंतर सलग सहा सामन्यात विजय मिळवला. तसेच प्लेऑफमधील स्थानही पक्क केलं.

IPL 2024, RCB Playoff : आरसीबीकडून प्लेऑफचा 'लगान' वसूल, यश दयाल खऱ्या अर्थाने ठरला 'कचरा'
| Updated on: May 19, 2024 | 12:47 AM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिमाखदारपणे एन्ट्री मारली आहे. सलग सहा सामने जिंकत आरसीबीने भल्याभल्यांना पराभवाचं पाणी पाजलं. एकीकडे चेन्नईचं प्लेऑफचं गणित सोपं असताना अवघड प्रश्न मात्र आरसीबीने सोडवला. नाणेफेकीचा कौल जिंकून चेन्नई सुपरि किंग्सने आरसीबीला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. खरं तर प्लेऑफचं आव्हान हे 200 धावांचं होतं. त्यामुळे काहीही करून चेन्नई सुपर किंग्सला 20 षटकात 200 धावांवर रोखायचं होतं. पण रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीची जोडी जमल्यानंतर हे गणित सहज सुटेल असं वाटत होतं. शेवटच्या षटकात 17 धावांची आवश्यकता होती आणि फाफने हे षटक यश दयालच्या हाती सोपवलं. तोच दयाल ज्याला मागच्या पर्वात रिंकू सिंहने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारत सामना जिंकला होता. गुजरात टायटन्सने त्याला मिनी लिलावात रिलीज केलं. पण आरसीबीने त्याच्यावर विश्वास दाखवला. इतकं करूनही त्याच्या कचरा म्हणून टिपणी केली गेली. मात्र यात यश दयाल खचला नाही, फ्रेंचायसीनेही त्याला तशीच साथ दिली.  यशने महत्त्वाच्या सामन्यात शेवटचं षटक जबरदस्त टाकत संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवलं. यश दयालने एकूण चार षटकं टाकली त्यात 42 धावा देत 2 गडी बाद केले. खरं तर यश दयाल हा लगानमधील ‘कचरा’ ठरला आहे.

यश दयालच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर पहिल्याच फुल टॉस चेंडूवर महेंद्रसिंह धोनी षटकार मारला. त्यामुळे 5 बॉल 11 असं समीकरण आलं. सामना जिंकला तर प्लेऑफचं गणित सुटणार नाही असंच यावेळी वाटत होतं. मात्र यश दयालने दुसऱ्याच चेंडूवर महेंद्रसिंह धोनीला तंबूत पाठवलं. तिसऱ्या चेंडूसाठी स्ट्राईकला आलेल्या शार्दुल ठाकुरला निर्धाव चेंडू टाकला. चौथ्या चेंडूवर एक धाव घेण्यात शार्दुल यशस्वी ठरला. त्यामुळे 2 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आलं. आयपीएलमध्ये कायम चमकदार कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजासाठी हे सोपं आव्हान होतं. पण त्याला एकही धाव घेता आली नाही. दोन्ही चेंडू यश दयालने निर्धाव ठाकले. सामना 27 धावांनी जिंकला असला तरी खरा विजय हा 9 धावांनी झाला असंच म्हणावं लागेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.