सुरेल मैफिलीचा शेवट, खय्याम यांचं निधन

| Updated on: Aug 19, 2019 | 10:45 PM

गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मोहम्मद जहूर खय्याम हे भारतीय सिनेसृष्टीतील मोठं नाव होतं.

सुरेल मैफिलीचा शेवट, खय्याम यांचं निधन
Follow us on

मुंबई : भारतीय सिनेमातील दिग्गज संगीतकार खय्याम (Mohammed Zahur Khayyam) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी (Mohammed Zahur Khayyam ) अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मोहम्मद जहूर खय्याम हे भारतीय सिनेसृष्टीतील मोठं नाव होतं.

संगीत विश्व आणि खय्याम साब यांचं वेगळंच नातं होतं. वयाच्या 17 व्या वर्षी लुधियानामध्ये त्यांनी करिअरची सुरुवात केली. 1953 मध्ये रिलीज झालेल्या फुटपाथ सिनेमातील त्यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं. 1961 च्या शोला और शबनम या सिनेमातून खय्याम यांना वेगळी ओळख मिळाली.

खय्याम यांनी आखिरी खत, कभी-कभी, त्रिशूल, नुरी, बाजार, उमराव जान आणि यात्रा अशा अनेक सिनेमांना संगीत दिलं. त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय. 2007 मध्ये संगीत नाटक अकादमी, तर 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

कभी-कभी आणि उमराव जान या सिनेमांसाठी खय्याम यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. विशेष म्हणजे 2007 मध्ये आलेल्या यात्रा सिनेमालाही त्यांनी संगीत दिलं होतं.

‘वो सुबह कभी तो आएगी’, ‘जाने क्या ढूंढती रहती हैं ये आंखें मुझमें’, ‘बुझा दिए हैं खुद अपने हाथों, ‘ठहरिए होश में आ लूं’, ‘ ‘शामे गम की कसम’, अशी अनेक गाणी गाजलेली आहेत.