AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चीनची मदत घेण्याची भाषा करणाऱ्या फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करा; काळ्या पाण्याची शिक्षा द्या’

फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करुन 10 वर्षांसाठी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवा. | Sanjay Raut

'चीनची मदत घेण्याची भाषा करणाऱ्या फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करा; काळ्या पाण्याची शिक्षा द्या'
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 31, 2020 | 3:48 PM
Share

मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी चीनची मदत घेण्याची भाषा करणाऱ्या फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलेच फटकारले. मेहबुबा मुफ्ती असो किंवा फारुख अब्दुल्ला असोत, कोणीही चीनची मदत घेऊन भारतीय संविधानाला आव्हान देण्याची भाषा करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तेव्हा फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करुन 10 वर्षांसाठी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवा. मुळात ते अशाप्रकारचे वक्तव्य करुन बाहेर फिरुच कसे शकतात, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Sanjay Raut slams Farooq Abdullah and Mehbooba Mufti over Article 370 statement)

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास चीनची मदत घेऊ, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. काश्मीरमधील अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 ए रद्द करण्यास फारुख अब्दुल्ला यांचा विरोध होता. केंद्र सरकारने अध्यादेश काढून अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांना बराच काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वीच त्यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली होती. यानंतरही फारुख अब्दुल्ला यांनी अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 ए चे समर्थन करणे सुरुच ठेवले आहे. काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० आणि अनुच्छेद 35 ए पुन्हा लागू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मेहबुबा मुफ्तींच्या वक्तव्यानंतर वादंग जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा दिला जात नाही तोपर्यंत मी तिरंगा हातात धरणार नाही, असे वक्तव्य ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केले होते. त्यांनी जम्मू काश्मीरचा जुना ध्वज परत देण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात जम्मू काश्मीरमध्ये त्यांना चांगलाच विरोध होताना दिसतोय. या वक्तव्याचा निषेध करत ‘पीडीपी’च्या तीन प्रमुख नेत्यांनी पक्षाचा राजीनामाही दिला होता.

संबंधित बातम्या:

चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची आशा- फारुख अब्दुल्ला

काश्मीरमधून कलम 370 हटवून काय केलं; काय परिस्थिती बदलली?; संजय राऊतांचा भाजपाला थेट सवाल

मोदी सरकारने काश्मीर विकायला काढलाय; ओमर अब्दुल्लांची खरमरीत टीका

(Sanjay Raut slams Farooq Abdullah and Mehbooba Mufti over Article 370 statement)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...