राज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला

भाजप बहुतेक नेते पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.

राज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 1:27 PM

पुणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर भेट घेतली असता राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. भाजपचे बहुतेक नेते पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. (shiv sena leader sanjay raut slams governor bhagat singh koshyari)

पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमाला संबोधित करताना संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे. भाजपचे लोकही पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही मानू लागले आहेत. त्यामुळे मी पवारांना भेटून राज्यपालांना मार्गदर्शन करायला सांगणार आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता केली.

दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटून वाढीव वीज बिलाबाबत तक्रार केली होती. हे वीज बिल कमी करण्याचं आणि दूधाचे दर निश्चित करण्याबाबतचं निवेदन राज यांनी राज्यपालांना दिलं होतं. तेव्हा राज्यपालांनी राज यांना पवारांना भेटण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपाल आणि राज यांच्यावर जोरदार निशाणा साधला. (shiv sena leader sanjay raut slams governor bhagat singh koshyari)

संबंधित बातम्या:

राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, आमचं हिंदुत्व राजकीय नाही; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

…तर ही धर्मांधता म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल, शिवसेनेचा निशाणा

(shiv sena leader sanjay raut slams governor bhagat singh koshyari)

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.