भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकच्या 5 ते 7 घुसखोरांचा खात्मा

भारतीय लष्कराने काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या पाच ते सात बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमकडून (BAT) भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न लष्काराने हाणून पाडला आहे.

भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकच्या 5 ते 7 घुसखोरांचा खात्मा
Follow us
| Updated on: Aug 04, 2019 | 12:10 AM

श्रीनगर : भारतीय लष्कराने काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या पाच ते सात बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमकडून (BAT) भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. हे पाकिस्तानी कमांडो भारतीय सीमेत घुसण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, भारतीय लष्कराने यांना ठार केलं. यांचे मृतदेह अद्यापही नियंत्रण रेषेवर पडलेले आहेत. भारतीय लष्कर आणि घुसखोरांमध्ये अजूनही चकमक सुरु असल्याने या मृतदेहांना अद्याप ताब्यात घेण्यात यश आलेलं नाही. गेल्या 36 तासांपासून ही चकमक सुरु आहे.

यापूर्वी पाकने भारतीय सेना ही नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसीवर क्लस्टर स्फोटकांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, भारताने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले. पाकिस्तानने केलेला आरोप हा खोटा असून पाक आपली फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे, असं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून लष्कराची काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु आहे. त्यामुळे या भागात गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुरुवारी (1 ऑगस्ट) झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केलं.  त्याशिवाय बांदीपोरा जिल्ह्यात सीमा रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांचाही लष्काराने खात्मा केला होता.

वृत्तसंस्था एएनआयने जारी केलेल्या फोटोंमध्ये नियंत्रण रेषेवर चार मृतदेह दिसत आहेत. हे मृतदेह पाकिस्तानच्या एसएसजी कमांडो किंवा दहशतवाद्यांचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्कराच्या शोध मोहिमेत पाकिस्तान सतत अडचणी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानकडून शोध मोहिमेत अडचण निर्माण केली जात आहे. यामुळे ते जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात असल्याचं भारतीय लष्काराने म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.