इराण-अमेरिका तणावाच्या भारतालाही झळा, इंधन आणि सोन्याच्या दरात मोठी वाढ

बगदादमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे जनरल कासीम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराण आणि अमेरिकेमधील तणाव प्रचंड वाढला आहे (Iran America War affect Fuel and Gold price).

इराण-अमेरिका तणावाच्या भारतालाही झळा, इंधन आणि सोन्याच्या दरात मोठी वाढ
Follow us
| Updated on: Jan 05, 2020 | 4:33 PM

नवी दिल्ली : बगदादमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे जनरल कासीम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराण आणि अमेरिकेमधील तणाव प्रचंड वाढला आहे (Iran America War affect Fuel and Gold price). तेथे युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे. दुसरीकडे इराणने देखील अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिलाय. या सर्व परिस्थितीचा परिणाम केवळ या दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. याची थेट झळ भारतालाही बसत आहे. भारतातही इंधन आणि सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. दुसरीकडे शेअर बाजारातही याचा परिणाम दिसत आहे (Iran America War affect Fuel and Gold price).

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल्याच्या किमतीत प्रति बॅरल 3 डॉलरची वाढ झाली आहे. शुक्रवारी (3 जानेवारी) हा दर 70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेला आहे. अखेर 68.76 डॉलर प्रति बॅरलवर बाजार बंद झाला.

इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) कुद्स फोर्सचे प्रमुख सुलेमानी यांना ठार केल्याची बातमी आल्यानंतर भारतात सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. सेंसेक्स 162 अंकांनी आणि निफ्टी 55 अंकांनी खाली आला. गुंतवणुकदारांनी शेअर बाजारातील पैसा काढून सोन्यात गुंतवला. त्यामुळे सोन्याच्या किमतीत 752 रुपये प्रति तोळा वाढ झाली. दिल्लीत सोने 40,652 रुपये प्रति 10 ग्राम (1 तोळा) दर होता.

या घटनाक्रमाचा परिणाम रुपयाच्या मुल्यावरही झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी 44 पैसांनी घसरला. रुपयाचं मुल्य 71.81 प्रति डॉलर इतकं झालं. आधीपासून आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या अडचणी यामुळे वाढणार आहेत. मध्य-पूर्व आखाती देशांमधील तणाव वाढल्याने त्याचा इंधन पुरवठ्यावर थेट परिणाम झाला. कच्च्या तेलाचा पुरवठा घटल्याने भारतातील इंधनाचे दरही गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

बाजारापासून सरकारी योजनांपर्यंत सर्व ठिकाणी युद्धाचा परिणाम

इंधन दरवाढीचा परिणाम मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांवर अधिक होणार आहे. यामुळे कंपनी आणि उद्योगांमध्ये नोकरी कपातीचं संकटही वाढू शकतं. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीतही अडथळे येऊ शकतात. सरकारकडून या योजनांवरील खर्च कमी होण्याचीही शक्यता आहे. तसेच नव्या योजनांच्या घोषणांवर निर्बंध येऊ शकतात.

Non Stop LIVE Update
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.