AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहताचा ‘सोढी’ डिप्रेशनमध्ये? गुरुचरण सिंगबद्दल ‘गोगी’ने केला मोठा खुलासा, म्हणाला, पाच महिन्यांपूर्वी..

Gurucharan Singh : तारक मेहता का उल्टा चश्मा फेम गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून सर्वजण हैराण झालेत. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. आता गुरुचरण सिंग याला बेपत्ता होऊन बरेच दिवस झालेत. मात्र, अजूनही गुरुचरण सिंग कुठे आणि असा आहे, याबद्दल काहीच खुलासा हा होऊ शकला नाहीये.

तारक मेहताचा 'सोढी' डिप्रेशनमध्ये? गुरुचरण सिंगबद्दल 'गोगी'ने केला मोठा खुलासा, म्हणाला, पाच महिन्यांपूर्वी..
Gurucharan Singh
| Updated on: May 01, 2024 | 1:19 PM
Share

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करणारा अभिनेता अर्थात गुरुचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. अभिनेता बेपत्ता होऊन आता आठ दिवसांपेक्षाही अधिक कालावली झालाय. 22 एप्रिल 2024 रोजी गुरुचरण सिंग हा दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, गुरुचरण सिंग विमानतळापर्यंत देखील पोहचला नाही. अभिनेता बेपत्ता झाल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी खळबळ बघायला मिळाली. गुरुचरण सिंग याने अनेक वर्षे तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारली. अभिनेत्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

सोढी बेपत्ता झाल्यानंतर तारक मेहता मालिकेतील कलाकारांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच तारक मेहता मालिकेत सोढीच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाह याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये समय शाह काही मोठे खुलासे करताना दिसलाय. आता गोगीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

समय शाह म्हणाल की, माझी आणि गुरुचरण सिंग यांची भेट दिलीप जोशी यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये झाली. यावेळी आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो. हेच नाही तर चार पाच महिन्यांपूर्वीच आमचे फोनवर देखील बोलणे झाले, यावेळी आम्ही एक तासांपेक्षाही अधिक वेळ गप्पा मारत बसलो होतो. ते मला त्यांच्या मुलासारखे मानतात.

हेच नाही तर ज्यावेळी माझे आणि त्यांचे बोलणे झाले, त्यावेळी ते माझे मनोबल वाढवत होते. ज्यावेळी माझे आणि त्यांचे बोलणे झाले, त्यावेळी ते खूप खुश होते. बरेच लोक बोलत आहे की, ते डिप्रेशनमध्ये होते, पण मला तसे अजिबातच वाटत नाही. ते त्याप्रकारचे अजिबात नाहीत. पण एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात काय सुरू आहे हे सांगणे फार अवघड आहे.

माझे आणि त्यांचे बोलणे झाले त्यावेळी ते ठिक होते. ते कायमच माझ्याबद्दल विचारणा करत असतं. मला वाटत नाही ते डिप्रेशनमध्ये वगैरे नसतील. समय शाह याने हे देखील सांगितले की, गुरुचरण सिंग हे बेपत्ता झाल्याचे ऐकल्यापासून त्याला मोठा धक्का बसलाय. सुरूवातीला मी यावर अजिबातच विश्वास ठेवाला नाही, परंतू यानंतर मला याबद्दल समजले, असेही समय शाहने म्हटले.

गुरुचरण सिंग  2020 मध्येच तारक मेहता मालिका सोडली. मात्र, असे असतानाही लोक आजही गुरुचरण सिंगला सोढीच्याच नावाने ओळखतात. गुरुचरण सिंग सोशल मीडियावरही सक्रिय होता. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत. चाहते आता गुरुचरण सिंग याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत.

Follow Us
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....