AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tim Cook: टिम कुक यांचा ॲपलला निरोप; गडगंज श्रीमंती, प्रसिद्धी तरी… तुम्ही म्हणाल माणूस असावा तर असा!

Tim Cook Apple: सीईओ टिम कुक ॲपलला निरोप देणार आहेत. त्यांची जबाबदारी आता जॉन टर्नस हे सांभाळतील. कुक यांनी या कंपनीसाठी 15 वर्षे खर्ची घातले. गडगंज श्रीमंती, प्रसिद्धी असली तरी ती त्यांच्या डोक्यात गेलेली नाही. त्यांनी कंपनीला बाय बाय म्हणताना एक मोठी इच्छा व्यक्त केली आहे.

Tim Cook: टिम कुक यांचा ॲपलला निरोप; गडगंज श्रीमंती, प्रसिद्धी तरी... तुम्ही म्हणाल माणूस असावा तर असा!
टिम कुकचा ॲपलला निरोपImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 15, 2026 | 6:53 PM
Share

आयफोनसह इतर उत्पादनं तयार करणाऱ्या ॲपल कंपनीचे सीईओ टिम कुक लवकरच पायउतार होणार आहे. पुढील महिन्यापासून जॉन टर्नस हे सीईओ पदी असतील. कुक यांनी या कंपनीत 15 वर्षे काम केलं आहे. गडगंज श्रीमंती, पायाशी असंख्य सुखं लोळण घेत असताना, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही कुक यांची कंपनी सोडतानाच इच्छा ऐकून तुम्ही सुद्धा भारावून जाल. 1 सप्टेंबर 2026 रोजीपासून जॉन टर्नस हे कंपनीची जबाबदारी संभाळतील. तर कुक हे कार्यकारी संचालक म्हणून कंपनीसोबत काम करतील.

चांगला आणि प्रामाणिक व्यक्ती

टिम कुक यांनी नुकत्याच एका मुलाखतीत कंपनीचे सीईओ पद सोडताना एक साधी इच्छा व्यक्त केली. कंपनीतीलच नाही तर जगातील लोकांनी त्यांना श्रीमंत, प्रसिद्ध व्यक्ती म्हणून नाही तर एक चांगला आणि प्रामणिक व्यक्ती म्हणून अखेरपर्यंत ओळखावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांचे पाय अजूनही जमिनीवरच असल्याचे दिसून आले. इतक्या मोठ्या पदावरून पायउतार होताना, मागे समृद्ध वारसा असतानाही प्रसिद्धी त्यांच्या डोक्यात गेली नाही. त्यांचा हा साधेपणा अनेकांना प्रेरणा देऊन गेला.

स्टीव्ह जॉब्सनंतर ॲपल कंपनीचे सीईओ

टिम कुक हे 2011 मध्ये ॲपल कंपनीचे सीईओ झाले. त्यांनी स्टीव्ह जॉब्स यांची जागा घेतली. जॉब्स यांचे आजारपण वाढले होते. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले. कुक 1998 मध्ये ॲपल कंपनीत दाखल झाले होते. कंपनीत एक एक पायरी चढत ते वरिष्ठ उपाध्यक्ष झाले. त्यानंतर ते सीईओ झाले. कंपनीच्या पुरवठा साखळीवर त्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांच्या काळात कंपनीने मोठी झेप घेतली.

जॉन टर्नस नवीन सीईओ, कुक यांच्यावर मोठी जबाबदारी

ॲपल कंपनीत पुन्हा एकदा नेतृत्व बदल होत आहे. कंपनीचे हॉर्डवेअर इंजिनिअरिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टर्नस 1 सप्टेंबर 2026 रोजी सीईओ होतील. कुक यांनी त्यांना शुभेच्छा दिला आहे. आणि योग्य ठिकाणी वेळ खर्ची घालण्याचा सल्ला दिला आहे. युझर्ससाठी काय चांगले आहे, ते मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. जगातील सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनं तयार करणे हेच कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. सीईओ पद सोडल्यानंतरही कुक हे कंपनीसोबत असतील. त्यांनी सीईओ पदावरून जाता जाता जी प्रामाणिक इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरून सर्वांची त्यांनी मनं जिंकली आहे. प्रसिद्धी अथवा श्रीमंती त्यांच्या डोक्यात शिरली नाही. त्यांचे पाय जमिनीवर असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...