पुण्यात समोसे बनवताना गॅसचा भडका, चौघे भाजले

पुण्यात समोसे बनवताना गॅसचा भडका, चौघे भाजले

पुणे: पुण्यातील कर्वेनगर इथं गॅसचा भडका उडाल्यानं चार जण भाजले आहेत. हे चारही जण 25 ते 70 टक्क्यांपर्यंत भाजले आहेत. घरात समोसे बनवताना सकाळी सहा वाजता गॅसचा भडका उडाला. या भडक्यात  रमन गौतम, संदीप कुमार नाई, अनुशिंग चौहान आणि रामनरेश गौतम हे गंभीर भाजले आहेत.

रमन 40 टक्के,  संदिप 45 टक्के, अनुशिंग 70 तर रामनरेश 50 टक्के भाजला आहे. चौघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चौघेही परप्रांतीय असून, ते समोसा विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे सकाळी ते बटाटा उकडून समोसा बनवत होते. यावेळी एका गॅसच्या टाकीच्या पाईप मधून गॅसगळती झाली.

शेजारीच दुसरा पेटता गॅस असल्यानं क्षणार्धात गॅसचा भडका उडाला. या भडक्यामुळे चौघांनीही पेट घेतला. त्यामुळं घाबरुन सर्वजण घराबाहेर पडले. या भडक्यानं घरातील साहित्य अस्ताव्यस्त झालं.

Published On - 3:07 pm, Mon, 11 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI