106 व्या वर्षी कोरोनाला धोबीपछाड, डोंबिवलीच्या ‘आनंदी’ आजींचं आदित्य ठाकरेंकडून अभिनंदन

| Updated on: Sep 20, 2020 | 4:15 PM

डोंबिवलीमधील 106 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे (Grand Mother recover from Corona in Kalyan).

106 व्या वर्षी कोरोनाला धोबीपछाड, डोंबिवलीच्या आनंदी आजींचं आदित्य ठाकरेंकडून अभिनंदन
Follow us on

डोंबिवली : डोंबिवलीमधील 106 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे (Grand Mother recover from Corona in Kalyan). आनंदी पाटील असं या आजीबाईंचे नाव आहे. डोंबिवली पश्चिम येथे आनंदी पाटील राहतात (Grand Mother recover from Corona in Kalyan).

आजीबाईंसह त्यांच्या सुनेला 13 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. या दोघांना डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलातील कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभरात 106 वर्षाच्या आनंदीबाई यांनी कोरोनावर मात केली आहे.

आजीबाईंनी कोरोनावर मात केल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटद्वारे वनरुपी क्लिनिकचे डॉ राहुल घुले, पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 हजार पार गेली आहे. यामधील 32 हजार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, तर 762 जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

कल्याणच्या जोशीबागेतील एकाच कुटुंबातील 35 जणांना कोरोनाची लागण

कोरोनाग्रस्त महिलेला अव्वाच्या सव्वा बिल, कल्याणच्या सेना नगरसेवकाने उचलून घरी पोहोचवले