भूमितीच्या पेपरनंतर बेपत्ता, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

| Updated on: Mar 14, 2020 | 12:04 PM

वसमत-परभणी रोडवर असलेल्या कॅनॉलमध्ये दीपक नरोटे या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. Hingoli Missing Student found dead

भूमितीच्या पेपरनंतर बेपत्ता, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला
Follow us on

हिंगोली : दहावीची परीक्षा सुरु असतानाच हिंगोलीतील विद्यार्थ्यावर काळाने घाला घातला. भूमितीचा पेपर सोडवल्यानंतर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह कालव्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Hingoli Missing Student found dead)

दहावीत शिकणारा दीपक नरोटे हा विद्यार्थी दोन दिवसांपासून बेपत्ता होता. 12 तारखेला भूमितीचा पेपर देऊन दीपक पोहण्यासाठी गेला असल्याची माहिती आहे. त्यानंतर तो बेपत्ता होता. मात्र बीजगणिताचा पेपर सोडवण्याआधीच दीपकचा मृतदेह आढळला आहे.

दीपक हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील जयनगर भागात राहत होता. परंतु आज (शनिवार 14 मार्च) सकाळी वसमत-परभणी रोडवर असलेल्या कॅनॉलमध्ये दीपकचा मृतदेह आढळून आला.

पाण्यात बुडून त्याचा अपघाती मृत्यू झाला, की यामागे काही घातपात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

दीपक मूळ रहिवासी असलेल्या शिरडशहापूर भागात शोककळा पसरली आहे. दीपकच्या धक्कादायक मृत्यूमुळे नरोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने वसमत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Hingoli Missing Student found dead)

कोल्हापुरात विद्यार्थिनीचा विषप्रयोगाने मृत्यू

गेल्याच महिन्यात, कोल्हापूरमध्ये शाळेत पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्यामुळे दहावीच्या विद्यार्थिनीचाही मृत्यू झाला होता. सानिका माळीच्या मृत्यूप्रकरणी तिला कीटकनाशक आणून देणाऱ्या शिक्षकाला अटक झाली होती.

शाळेत पिण्याच्या पाण्यातून विषबाधा, कोल्हापुरात दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

सानिकाच्या शाळेत दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा होती. प्रात्यक्षिकानंतर वर्गात आलेल्या सानिकाने आपल्या दप्तरातील बाटलीतून पाणी प्यायलं. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती घरी गेली. सानिकाची प्रकृती खालावल्यामुळे तिला शिरोळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं, मात्र तिचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी सानिकासोबत घातपात झाल्याचा आरोप केल्यामुळे पोलिसांनी तपास सुरु केला होता. अखेर, तिच्या शिक्षकाने तिला कीटकनाशकाची बाटली आणून दिल्याचं समोर आलं.

आजच्या आणखी काही बातम्या :

(Hingoli Missing Student found dead)